Social Media Day 2023: सोशल मीडिया दिवसानिमित्त मास्टरब्लास्टर सचिनचे 'हे' ट्विट व्हायरल...

आजच्या युगात सर्व काही डिजिटल झाले आहे.
Social Media Day 2023 History And Significance | Sachin Tendulkar Viral Tweet
Social Media Day 2023 History And Significance | Sachin Tendulkar Viral Tweet Dainik Gomantak

Social Media Day 2023 History And Significance: आज जागतिक सोशल मीडिया दिवस आहे. आजच्या युगात सर्व काही डिजिटल झाले आहे. आज लोक जगात कुठेही घरात बसून बोलू शकतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतात. आजच्या दिवशी जगभरात सोशल मीडिया डे साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया सोशल मीडियाशी संबंधित काही गोष्टी.

माहितीनुसार, 30 जून 2010 रोजी सोशल मीडिया दिवसाची सुरुवात झाली. या दिवशी Mashable ने सोशल मीडिया सुरू केला. सोशल मीडिया म्हणजे लोकांना एकमेकांशी जोडणारी संपर्क यंत्रणा. आज जगातील प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो.

Social Media Day 2023 History And Significance | Sachin Tendulkar Viral Tweet
Daily Horoscope 30 June: 'या' राशीच्या लोकांची शेजाऱ्यांशी भांडण होण्याची शक्यता; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

जागतिक सोशल मीडिया दिवस हा आपल्या समाजाला घडवण्यात सोशल मीडियाच्या परिवर्तनीय भूमिका मांडणारा दिवस आहे. सोशल मीडियाने संवाद, कनेक्टिव्हिटी आणि स्व-अभिव्यक्ती या मार्गांनी क्रांती घडवून आणली आहे.

तसेच त्यावर विचार करण्यासाठी हे व्यक्ती आणि संस्थांना एक उत्तम व्यासपीठ आहे. मात्र सामाजिक हितासाठी सोशल मीडियाचा लाभ घेण्यास प्रोत्साहन देताना त्याच्या वापराशी संबंधित आव्हाने आणि जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकणे महत्वाचे आहे. सोशल मीडियाला खूप महत्त्व आहे कारण ते विविध व्यवसायांना त्यांच्या प्रेक्षकांशी जोडण्याचे आणि त्यांना ग्राहकांमध्ये रूपांतरित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे माध्यम आहे.

मास्टरब्लास्टर सचिनचे 'हे' ट्विट व्हायरल...

जागतिक सोशल मीडिया दिवसानिमित्त मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक खास ट्विट केले आहे, जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. तो या ट्विटमध्ये म्हणतो..

फेसबुकवर तुम्ही सगळे गंभीर असता; Twitter वर विनोदी; इंस्टाग्रामवर चांगले दिसता; आणि वास्तविक जीवनात तुम्ही अद्भुत व्यक्ती आहात.

सोशल मीडियावर इतक्या गोष्टी होतात शेअर...

2020 च्या अहवालानुसार, YouTube वर दर 60 सेकंदाला 4,320 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड केले जातात. इंस्टाग्रामवर दर मिनिटाला 2,16,00 नवीन फोटो अपलोड केले जातात.

याव्यतिरिक्त, प्रत्येक 60 सेकंदाला Pinterest वर 3,472 फोटो पिन आणि Facebook वर 2,460,000 गोष्टी शेअर केल्या जातात. दर 60 सेकंदाला 2,77,000 ट्विट केले जातात. Snapchat वर दररोज 6 अब्ज व्हिडिओ पाहिले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com