Goa Chess: Representatives of Taluka Association after submitting nomination papers for Chess Election. Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: निवडणुकीत सात तालुक्यांत एकजूट

Goa Chess: पहिल्या दिवशी अकरा उमेदवारांचे अर्ज

किशोर पेटकर

पणजीः गोवा बुद्धिबळ संघटना (Goa Chess Association) कार्यकारी समितीच्या निवडणुकीत (Executive Committee Election) सात तालुक्यांची एकजूट असू शकते, तसे चित्र उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या (Nominations Filing) पहिल्या दिवशी गुरुवारी दिसले. विविध पदासाठी पहिल्या दिवशी या तालुक्यातील अकरा जणांनी अर्ज सादर केले. निवडणुकीसाठी बार्देश, डिचोली, पेडणे, सत्तरी, तिसवाडी, फोंडा आणि सासष्टी तालुका प्रतिनिधीने अर्ज सादर केले. यामध्ये बार्देशचे विश्वास पिळर्णकर, तिसवाडीचे महेश कांदोळकर, सासष्टीचे आशेष केणी हे प्रमुख उमेदवार आहेत. त्यांनी अध्यक्ष, सचिव, खजिनदार या महत्त्वाच्या पदासाठी अर्ज सादर केले आहेत. मावळत्या समितीत पिळर्णकर खजिनदार, तर कांदोळकर व केणी उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी संघटनेचे सचिवपद भूषविलेले तिसवाडीचे अरविंद म्हामल यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

गोवा बुद्धिबळ संघटनेशी संलग्न बारापैकी अन्य पाच तालुका संघटनेच्या प्रतिनिधींनी पहिल्या दिवशी अर्ज सादर केले नाहीत. पाच ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची पाच रोजीच छाननी होईल. त्यानंतर दहा ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. निवडणूक 22 ऑगस्ट रोजी नियोजित आहे. निवडणूक नियमानुसार एक उमेदवार तीन जागांसाठी अर्ज सादर करू शकतो. तथापि, एक उमेदवार फक्त एका जागेसाठी निवडणूक लढवू शकतो. वीजमंत्री नीलेश काब्राल हे मावळते अध्यक्ष असून, त्यांनी व सचिव किशोर बांदेकर यांनी पहिल्या दिवशी अर्ज सादर केला नव्हता. ते अनुक्रमे केपे व मुरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात, शिवाय राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या धारबांदोडा तालुका, काणकोण व सांगे तालुका प्रतिनिधीनेही अर्ज दाखल केलेला नाही. काही दिवसांपूर्वी आपण यावेळेस गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक रिंगणात नसण्याचे संकेत बांदेकर यांनी दिले होते.

पहिल्या दिवशी सादर उमेदवारी अर्ज

- बार्देश ः विश्वास पिळर्णकर (अध्यक्ष, सचिव, खजिनदार), रामचंद्र परब (संयुक्त खजिनदार)

- डिचोली ः सत्यवान हरमलकर (उपाध्यक्ष)

- पेडणे ः ॲड. तुकाराम शेट्ये (संयुक्त सचिव)

- सत्तरी ः कालिदास हरवळकर (संयुक्त सचिव)

- तिसवाडी ः महेश कांदोळकर (अध्यक्ष, सचिव, खजिनदार), अरविंद म्हामल (उपाध्यक्ष)

- फोंडा ः सागर साकोर्डेकर (उपाध्यक्ष), अमोघ नमशीकर (संयुक्त सचिव)

- सासष्टी ः आशेष केणी (अध्यक्ष, सचिव, खजिनदार), दामोदर जांबावलीकर (उपाध्यक्ष, संयुक्त सचिव)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT