Goa Chess: Ethan Vaz  Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: विश्वकरंडक बुद्धिबळात एथनची दुहेरी चमक

Goa Chess: 10 वर्षांखालील स्पर्धेनंतर त्याने 12 वर्षांखालील गटातील अंतिम फेरीसाठी पात्रता

दैनिक गोमंतक

पणजी : गोव्याचा बुद्धिबळपटू (Goa Chess Player) एथन वाझ (Ethan Vaz) विश्वकरंडक युवा बुद्धिबळ स्पर्धेत आणखी एका गटात खेळणार आहे. 10 वर्षांखालील स्पर्धेनंतर त्याने 12 वर्षांखालील गटातील अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. सासष्टी तालुक्यातील राय येथील एथन आगामी कॅडेट्स व युवा विश्वकरंडक बुद्धिबळ (Cadets and Youth World Cup Chess) स्पर्धेत चमक दाखविली. नऊ वर्षीय एथनने यापूर्वीच 10 वर्षांखालील गटात अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली आहे. 12 वर्षांखालील विश्वकरंडक पात्रता लढतीत त्याने संयुक्त तिसरा क्रमांक मिळविला. त्यानंतर टायब्रेकर गुणांत सर्वसाधारण क्रमवारीत पाचवा क्रमांक मिळविला. त्यामुळे तो विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

एथनने 10 फेऱ्यांतून साडेसात गुणांची कमाई केली. स्पर्धेत एथनचे एलो मानांकन 1384 इतके होते. नऊ डाव तो आपल्यापेक्षा जास्त मानांकन असलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळला. स्पर्धेतील त्याची कामगिरी 2050 मानांकनाची ठरली. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर यांनी विश्वकरंडक स्पर्धेच्या दोन गटातील अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविलेल्या एथनचे अभिनंदन केले आहे. त्याचे आई-वडील लिंडा फर्नांडिस व एडविन वाझ यांनीही मुलाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. ग्रँडमास्टर बनणे हे एथनचे स्वप्न असून त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चेस गुरू गोवा अकादमीचे प्रकाश विक्रम सिंग त्याचे प्रशिक्षक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला! माजी पंतप्रधान देउबा आणि पत्नीला आंदोलकांची मारहाण; रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल!

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

SCROLL FOR NEXT