विनय तेंडुलकर, शरेंद्र नाईक, किशोर बांदेकर Dainik Gomantak
क्रीडा

Goa: बुद्धिबळ संघटना नाट्यमयरीत्या`बिनविरोध`

बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समिती निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचा विरोधकांचा आरोप

किशोर पेटकर

पणजी: गोवा (Goa) बुद्धिबळ संघटनेच्या (Chess Association) बहुचर्चित कार्यकारी समिती निवडणूक प्रक्रियेने मंगळवारी नाट्यमय वळण घेतले आणि सारी समिती बिनविरोध ठरली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घिसाडघाईने प्रक्रिया हाताळण्यात आली व त्यात गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. (Goa Chess Association election was uncontested)

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर (धारबांदोडा) गोवा बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध ठरले आहेत. तेंडुलकर यापूर्वी 2013-2017 या कालावधीसाठी संघटनेचे अध्यक्ष होते.

बुद्धिबळ संघटना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, 12 सदस्यीय कार्यकारी समितीत दामोदर जांबावलीकर (सासष्टी) व सागर साकोर्डेकर (फोंडा) हे दक्षिण गोव्यातून उपाध्यक्षपदी बिनविरोध ठरले आहेत. सचिवपदी शरेंद्र नाईक (काणकोण), खजिनदारपदी किशोर बांदेकर (मुरगाव) हे सुद्धा बिनविरोध आहेत, दक्षिण गोव्यातून संयुक्त सचिवपदी समीर नाईक (केपे) व किशोर गावस देसाई (सांगे), संयुक्त खजिनदारपदी रामचंद्र परब (बार्देश) बिनविरोध ठरल्याचे जाहीर केले. यापूर्वीच पाच ऑगस्टला उत्तर गोव्यातून अरविंद म्हामल (तिसवाडी) व सत्यवान हरमलकर (डिचोली) हे उपाध्यक्षपदी, तर अॅड. तुकाराम शेट्ये (पेडणे) व कालिदास हरवळकर (सत्तरी) हे संयुक्त सचिवपदी बिनविरोध ठरले होते.

अर्ज का नाकारले?

बुद्धिबळ निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार, अध्यक्षपदासाठी महेश कांदोळकर (तिसवाडी), सचिवपदासाठी आशेष केणी (सासष्टी), खजिनदारपदासाठी विश्वास पिळर्णकर (बार्देश), संयुक्त सचिवपदासाठी अमोघ नमशीकर (फोंडा) यांचे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आले. कारण - प्रत्येक तालुक्यासाठी एक पद देण्याचा ठराव संघटनेच्या विशेष आमसभेत 8 जानेवारी 2017 रोजी घेण्यात आला होता, जेणेकरून संलग्न बाराही तालुक्यास कार्यकारी समितीत प्रतिनिधित्व मिळावे. सध्याच्या कार्यकारी समितीत बाराही तालुक्यांना प्रतिनिधित्व मिळत आहे, तसेच बिनविरोध ठरलेल्यांत प्रत्येक तालुक्यातील एक प्रतिनिधी आहे, त्यामुळे संबंधित तालुक्यातील दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज संघटनेच्या विशेष आमसभेतील ठरावानुसार नाकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आता पुढे काय?

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या पत्रकानुसार, बारा सदस्यीय कार्यकारी समिती बिनविरोध ठरल्याने आता 22 ऑगस्ट रोजी होणारी नियोजित निवडणूक होणार नाही. ठरल्यानुसार संघटनेची आमसभा 22 ऑगस्ट रोजी होईल. मावळते सचिव किशोर बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसभेने नव्या कार्यकारी समिती निवडणूक प्रक्रियेस मान्यता देऊन शिक्कामोर्तब केल्यानंतर नूतन समिती कार्यभार स्वीकारेल. आमसभेचा निवडणुकीसंदर्भात इतिवृत्तांत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, गोवा क्रीडा प्राधिकरण, सोसायटी निबंधक, तसेच सर्व संबंधितांना पाठविण्यात येईल.

हा सारा गडबडघोटाळा : म्हामल

विरोधी गटातून उपाध्यक्षपदी बिनविरोध ठरलेले अरविंद म्हामल यांनी एकंदरीत निवडणूक प्रक्रियेस तीव्र आक्षेप घेतला आहे. संपूर्ण प्रक्रिया गडबडघोटाळा असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हामल यांनी नमूद केले, की पाच ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर गोव्यातून दोना जागांसाठी चौघे जण बिनविरोध ठरले. त्यानंतर पाच रोजीच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली आणि नंतर संध्याकाळी सहा वाजता निवडणुकीतील वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. तेव्हा आठ जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात होते आणि या पदासाठी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले होते. ठरावानुसार अर्ज नाकारले आहेत, तर छाननीच्या दिवशीच ही प्रक्रिया का झाली नाही, असा सवाल म्हामल यांनी केला आहे. निवडणुकीत बहुमत मिळणार नाही आणि निवडून येण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यानंतर घिसाडघाईने मंगळवारी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध ठरविण्यात आली, असा आरोपही म्हामल यांनी केला.

एकंदरीत घटनाक्रम

  • 5 ऑगस्ट रोजी उत्तर गोवा उपाध्यक्षपदी 2, संयुक्त सचिवपदी 2 उमेदवार बिनविरोध

  • अर्ज स्वीकारण्याचा 5 ऑगस्ट रोजी शेवटचा दिवस

  • छाननीनंतर बाकी 8 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणार

  • अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 ऑगस्टला कार्यकारी समिती बिनविरोध

  • अध्यक्ष, सचिव, खजिनदार व संयुक्त सचिवपदासाठी प्रत्येकी 1 अर्ज नाकारला

  • दक्षिण गोवा उपाध्यक्षपद निवडणुकीतून 4 जणांची, तर संयुक्त उपाध्यक्षपद निवडणुकीतून 2 उमेदवारांची माघार

  • संयुक्त खजिनदार पदाच्या निवडणुकीतून 2 पैकी 1 उमेदवाराची माघार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT