Cricket
Cricket Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या फलंदाजांची शरणागती!

दैनिक गोमन्तक

पणजी (Panaji) राजस्थानचा (Rajasthan) डावखुरा फिरकीपटू शुभम शर्मा याच्यासमोर गोव्याच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली, त्यामुळे विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत त्यांना गुरुवारी 84 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. चोवीस वर्षीय गोलंदाजाने भेदक मारा करताना 12 धावांत 5 विकेट घेतल्या. एलिट ई गट सामना झारखंडमधील रांची येथे झाला.

गोव्यातर्फे (Goa) सलामीचा आदित्य कौशिक याना सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याना व एकनाथ केरकर (27) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. ही जोडी फलंदाजी करत असताना गोव्याचा संघ विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे जाणवत होते, मात्र शुभमने एकनाथला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केल्यानंतर गोव्याच्या घसरणीस सुरवात झाली. लगेच लेगस्पिनर रवी बिष्णोईने कर्णधार दीपक हूडा याच्याकरवी आदित्यला झेलबाद केल्यानंतर गोव्याला 3 बाद 86 वरून सावरणे कठीण ठरले. आदित्यने 60 चेंडूंचा सामना करताना सात चौकार व एक षटकार मारला. राजस्थानने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर 8 बाद 257 धावा केल्या, प्रत्युत्तरात गोव्याचा डाव 42.3 षटकांत 173 धावांत संपुष्टात आला. शुभमने लिस्ट ए क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदविली. याशिवाय अनिकेत चौधरीने तीन, तर बिष्णोईने दोन गडी बाद केले.

राजस्थानचा सलामीवीर अभिजित तोमर याचे शतक आठ धावांनी हुकले. मात्र त्याने तीन विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून राजस्थानला भक्कम पायाभरणी करून दिली. लक्षय गर्गच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक एकनाथ केरकरच्या हाती झेल दिलेल्या अभिजितने 109 चेंडूंत पाच चौकार व चार षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. त्याने मनेंदर सिंग (23) याच्यासह 64 धावांची सलामी दिली. नंतर महिपाल लोमरोर (23) याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 51, तर दीपक हुडा (18) याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. गोव्यातर्फे लक्षय गर्ग, फेलिक्स आलेमाव, दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान : 50 षटकांत 8 बाद 257 (अभिजित तोमर 92, मनेंदर सिंग 23, महिपाल लोमरोर 23, दीपक हुडा 18, सलमान खान 18, समर्पित जोशी 40, रवी बिष्णोई नाबाद 20, श्रीकांत वाघ 4-0-22-0, लक्षय गर्ग 9-0-51-2, फेलिक्स आलेमाव 9-0-39-2, सुयश प्रभुदेसाई 2-0-11-0, अमित यादव 8-0-23-1, शुभम रांजणे 8-0-46-1, दर्शन मिसाळ 8-0-44-2, दीपराज गावकर 2-0-१16-0) वि. वि. गोवा : 42.3 षटकांत सर्वबाद 173 (स्नेहल कवठणकर 1, आदित्य कौशिक 53, एकनाथ केरकर 27, शुभम रांजणे 17, सुयश प्रभुदेसाई 2, दर्शन मिसाळ 11, दीपराज गावकर 7, लक्षय गर्ग 32, अमित यादव 3, श्रीकांत वाघ नाबाद 1, फेलिक्स आलेमाव 0, अनिकेत चौधरी 8-1-28-3, रवी बिष्णोई 10-1-47-2, शुभम शर्मा 9.3-2-12-5).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने फरशीवर फेकले, न्यायाधीशही चकित झाले; वाचा नेमकं प्रकरणं

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT