Suyash Prabhudesai Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy : गोव्याच्या फलंदाजांनी कर्नाटकला झुंजविले

गोमन्तक डिजिटल टीम

रणजी करंडक क्रिकेट सामन्यात धावफलकावर सहाशे धावा लावल्यानंतर गोव्याला दोन वेळा गुंडाळून विजयासाठी कर्नाटकचा संघ प्रयत्नशील आहे, पण यजमान संघाने त्यांना गुरुवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चांगलेच झुंजविले.

सुयश प्रभुदेसाई (87), सिद्धेश लाड (63) व कर्णधार दर्शन मिसाळ (नाबाद 66) यांच्या अर्धशतकांमुळे पाहुण्या संघाला प्रतीक्षेत राहावे लागले. पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने पहिल्या डावात 8 बाद 321 धावा केल्या. कर्नाटकच्या 603 धावांना उत्तर देताना फॉलोऑन टाळण्यासाठी यजमान संघाला आणखी 133 धावांची गरज आहे.

चहापानानंतर 9 धावांत 3 विकेट गमावल्या नसत्या तर गोव्याची स्थिती आणखी चांगली दिसली असती. दर्शन 66 धावांवर खेळत असून लक्षय 20 धावा करून त्याला साथ देत आहे. आठवी विकेट गमावल्यानंतर या जोडीने 16.1 षटके यशस्वीपणे किल्ला लढविताना नवव्या विकेटसाठी 51 धावांची अभेद्य भागीदारी केली. डावखुऱ्या दर्शनने छान फलंदाजी करताना 134 चेंडूंतील खेळीत नऊ चौकार व एक षटकार लगावला. त्याचे हे यंदाच्या स्पर्धेतील दुसरे अर्धशतक आहे.

फलंदाजांचा कडवा प्रतिकार

सकाळच्या सत्रात कालचा नाबाद फलंदाज सुमीरन आमोणकर याने खेळपट्टीवर नांगर टाकला. पहिल्या तासाभरात तब्बल 38 चेंडूंना तो सामोरा गेला, पण एकही धावही केली नाही. अखेरीस त्यांचा संघर्ष डावखुरा फिरकी गोलंदाज शुभांग हेगडे याने संपुष्टात आणला. सुयश व स्नेहल कवठणकर यांनी डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी 64 धावा केल्या. स्नेहलला कर्नाटकने जाळ्यात अडकवत फिरकी गोलंदाज के. गौतम याच्या गोलंदाजीवर मनीष पांडेच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. याच मैदानावर राजस्थानविरुद्ध द्विशतक केलेल्या सुयशला आणखी एका शतकासाठी तेरा धावा कमी पडल्या. त्याला शुभांगचे पायचीत बाद केले. स्नेहलने 165 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. नंतर एकनाथ केरकरला गौतमने पायचीत बाद करून गोव्याला पाचवा धक्का दिला.

अखेरच्या सत्रात पडझड

गोव्याने पाच विकेट गमावल्यानंतर सिद्धेश लाड व दर्शन यांनी डाव सावरण्यास सुरवात केली. मध्यमगती वैशाख याच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये निकिन जोस याने डाव्या हाताने अफलातून झेल पकडल्यामुळे सिद्धेशची जबाबदार खेळी व सहाव्या विकेटची 65 धावांची भागीदारी संपुष्टात आली. नंतर अर्जुन तेंडुलकर पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर मोहित रेडकरही जास्त वेळ टिकला नाही. त्यामुळे गोव्याची पडझड झाली.

पंचांनी दर्शन, लक्षयला रोखले

दिवसाचा खेळ संपत असताना मैदानावरील पंचांनी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवल्याने दर्शन मिसाळ व लक्षय गर्ग यांना रोखले. त्यामुळे शेवटच्या षटकात लक्षय याला हातावर तात्पुरते वैद्यकीय उपचारही घेणे शक्य झाले नाही.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक, पहिला डाव ः 7 बाद 603 घोषित

गोवा, पहिला डाव (1 बाद 45 वरुन) ः 109 षटकांत 8 बाद 321 (सुमीरन आमोणकर 30, सुयश प्रभुदेसाई 87, स्नेहल कवठणकर 21, सिद्धेश लाड 63, एकनाथ केरकर 5, दर्शन मिसाळ नाबाद 66, अर्जुन तेंडुलकर 0, मोहित रेडकर 6, लक्षय गर्ग नाबाद 20, रोनित मोरे 1-17, के. गौतम 3-109, व्ही. वैशाख 2-46, शुभांग हेगडे 2-79).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

गोव्यात Beach Wedding महागलं? दिवसाला मोजावे लागणारे तब्बल 'एवढे' रुपये, Price Details

Goa Today's News Live: इडीसीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री,इतर संचालकांचीही नेमणूक!

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थिनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

SCROLL FOR NEXT