Goa: अखिल गोवा मानांकन बॅडमिंटन (All Goa Badminton) मोसमातील पहिल्या स्पर्धेत अद्वैत बाळकृष्णन याने दुहेरी किताब पटकाविला. सनलाईट स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने गोवा बॅडमिंटन संघटनेच्या सहकार्याने घेतलेल्या स्पर्धेत अद्वैतने 13 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत आणि दुहेरीत विजेतेपद मिळविले. स्पर्धा कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये (Campal Indoor Stadium) झाली.
स्पर्धेतील अन्य वयोगटात, 19 वर्षांखालील मुलांत निशांत शेणई याने, तर मुलींत जान्हवी महाले हिने विजेतेपद मिळविले. 15 वर्षांखालील एकेरीत हर्ष माने मुलांत, तर के. साक्षी मुलींत विजेती ठरली. 17 वर्षांखालील एकेरीत अनीश कामतने मुलांत, निधी देसाईने मुलींत बाजी मारली. 13 वर्षांखालील मुलींत रितिका चेल्लुरी हिने विजेतेपद प्राप्त केले.
बक्षीस वितरण गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष रिचर्ड वाझ, सनलाईट स्पोर्टस अँड कल्चरल क्लबचे अध्यक्ष रूपचंद्र हुमरसकर, सचिव आर्नोल्ड रॉड्रिग्ज, खजिनदार भूषण वेर्णेकर, गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर, सचिव संदीप हेबळे, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू काशिनाथ जल्मी यांच्या उपस्थितीत झाले.
अंतिम निकाल:
13 वर्षांखालील गट: मुली एकेरी: रितिका चेल्लुरी वि. वि. शगुन सिंग 21-14, 21-13, मुलगे एकेरी: अद्वैत बाळकृष्णन वि. वि. आरूष पावसकर 21-16, 21-11.
15 वर्षांखालील गट: मुली एकेरी: के. साक्षी वि. वि. श्रीया सराफ 21-16, 21-13, मुलगे एकेरी: हर्ष माने वि. वि. यश देसाई 14-21, 21-13, 21-12.
17 वर्षांखालील गट: मुली एकेरी: निधी देसाई वि. वि. तनुश्री शादानी 21-16, 21-17, मुलगे एकेरी: अनीश कामत वि. वि. यश देसाई (पुढे चाल).
19 वर्षांखालील गट: मुली एकेरी: जान्हवी महाले वि. वि. निधी देसाई 21-12, 21-09, मुलगे एकेरी: निशांत शेणई वि. वि. अनीश कामत 21-17, 21-11.
13 वर्षांखालील मुली दुहेरी: अनाया कामत-ॲस्ट्रिड डायस वि. वि. अनया सिंग-आर्या मेत्री 21-12, 21-13. 13 वर्षांखालील मुलगे दुहेरी: अद्वैत बाळकृष्णन-पारस्मय शेणॉय वि. वि. आरुष पावसकर-शेन डिसोझा 21-15, 19-21, 21-15.
15 वर्षांखालील मुली दुहेरी: जिया कामत-के. साक्षी वि. वि. निसा धुपदाळे-सिनोव्हिया डिसोझा 21-13, 21-13. 15 वर्षांखालील मुलगे दुहेरी: प्रणव नाईक-सी. के. शाहीन वि. वि. हर्ष माने-यश देसाई (पुढे चाल).
17 वर्षांखालील मुलगे दुहेरी: सर्वज्ञ खांडेपारकर-चिराग महाले वि. वि. वेदांत चौहान-रुद्र फडते 21-17, 18-21, 21-16. 17 वर्षांखालील मिश्र दुहेरी: अश्मीत पार्सेकर-त्रिशा बिडये वि. वि. रुद्र फडते-मिनोष्का परेरा 21-18, 18-21, 21-19. 19 वर्षांखालील मुलगे दुहेरी: अयान शेख-यश हळर्णकर वि. वि. आर्यमान सराफ-चेतन मगदुम 21-18, 23-21
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.