Glenn Maxwell said that the light show during the drink break in the middle of the match is not good for the players:
भारतात सुरू असलेल्या विश्वचषकादरम्यान, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी स्टेडियममध्ये ड्रिंक ब्रेक दरम्यान लाइट शो आयोजित केला जात आहे, परंतु ऑस्ट्रेलियन संघात याबाबत मतभेद निर्माण होऊ लागले आहेत. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यावर खूश नसला तरी डेव्हिड वॉर्नरने याला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध विक्रमी शतक झळकावल्यानंतर मॅक्सवेल म्हणाला की, हे प्रेक्षकांसाठी चांगले आहे, पण खेळाडूंसाठी भयंकर आहे. तो म्हणाला, “मी असा प्रकार बिग बॅश लीग अनुभवला आहे."
अष्टपैलू मॅक्सवेल म्हणाला, "जेव्हा लाइट शोसाठी अंधार केल्यानंतर पुन्हा दिवे सुरू होतात, तेव्हा असे वाटते की डोळे विस्फारत आहेत आणि डोके दुखत आहेत." लाईट शो नंतर डोळे एडजस्ट करायला थोडा वेळ लागतो. मला वाटते की क्रिकेटपटूंच्या एकाग्रतेसाठी हा सर्वात भयंकर प्रकार आहे.
मॅक्सवेल पुढे म्हणाला, “ एकदा सामना सुरू असताना पर्थ स्टेडियमचे दिवे खराब झाले होते आणि मी फलंदाजी करत होतो. दिवे पुन्हा सुरू झाल्यानंतर जुळवून घेण्यासाठी मला बराच वेळ लागला. अशा परिस्थितीत, मी शक्य तितके डोळे झाकूण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. ही एक भयानक कल्पना आहे.
"हे चाहत्यांसाठी चांगले आहे पण खेळाडूंसाठी भयंकर आहे," असेही मॅक्सवेलने नमूद केले.
या लाइट शोवर मॅक्सवेल नाराज असला तरी, त्याचाच संघ सहकारी आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने लाइट शो चे समर्थन केले आहे.
एका यूजरने लाइट शोबाबत मॅक्सवेलचे वक्तव्य एक्सवर पोस्ट केल्यानंतर, त्याला डेव्हिड वॉर्नरने प्रतुत्यर दिले.
एक्स (ट्विटर) वर टिप्पणी करताना त्यांनी लिहिले, “मला लाईट शो खूप आवडला. व्वा, काय वातावरण होते. हे सर्व चाहत्यांसाठी आहे. "तुम्हा सर्वांशिवाय आम्ही मैदानात जी कामगिरी करतो ती करू शकणार नाही."
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 309 धावांनी विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर मिळवलेला सलग तिसरा विजय आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 399 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली. तसेच वॉर्नरने 93 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली.
त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने 71 धावांची आणि मार्नस लॅब्युशेनने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. नेदरलँड्सकडून लोगन वॅन बिकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सला 21 षटकात सर्वबाद 90 धावाच करता आल्या. नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त नेदरलँड्सकडून कोणालाही 15 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.