Glenn Maxwell 5th T20I Century X/cricketcomau
क्रीडा

Glenn Maxwell: 8 सिक्स अन् 12 फोर...! मॅक्सवेलने वादळी शतकासह केली रोहितच्या विश्वविक्रमाची बरोबरी

AUS vs WI, Maxwell Century: ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकत रोहित शर्माच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

Pranali Kodre

Glenn Maxwell 5th T20I Century:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात चालू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (11 फेब्रुवारी) ऍडलेडला पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी विजय मिळवत मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलिया अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने तुफानी शतक करत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी ऑस्ट्रेलियाने 57 धावांत 2 विकेट्स गमावल्यानंतर चौथ्या क्रमांकावर मॅक्सवेल फलंदाजीला उतरला होता.

त्याने फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने 19 व्या षटकात 50 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. नंतरही त्याने मोठे फटके खेळले. त्यामुळे तो 55 चेंडूत 120 धावांवर नाबाद राहिला. या शतकी खेळीत त्याने 12 चौकार आणि 8 षटकार मारले.

हे मॅक्सवेलचे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले. त्यामुळे त्याने रोहित शर्माच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता रोहितसह मॅक्सवेलही संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आला आहे.

रोहितनेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 शतके ठोकली आहेत. या विक्रमाच्या यादीत रोहित आणि मॅक्सवेल पाठोपाठ सूर्यकुमार यादव आहे. त्याने ४ शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज (आकडेवारी 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत)

  • 5 शतके - रोहित शर्मा (151 सामने)

  • 5 शतके - ग्लेन मॅक्सवेल (102 सामने)

  • 4 शतके - सूर्यकुमार यादव (60 सामने)

  • 3 शतके - सबावून दाविझी (31 सामने)

  • 3 शतके - कॉलिन मुनरो (65 सामने)

  • 3 शतके - बाबर आझम (109 सामने)

ऑस्ट्रेलियाचा विजय

दरम्यान, मॅक्सवेलच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 बाद 241 धावा उभारल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलव्यतिरिक्त केवळ टीम डेव्हिडनेच 30 धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 14 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला 20 षटकात 9 बाद 207 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोवमन पॉवेलने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली.

तसेच आंद्रे रसेलनेही 16 चेंडूत 37 धावा केल्या. त्याचबरोबर जेसन होल्डरने 16 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

Goa Live Updates: वास्कोतील बेपत्ता मुलगा सापडला प्रयागराजमध्ये

Jatindranath Das: भगतसिंगांसोबत केले 63 दिवस उपोषण, तुरुंगातच सोडले प्राण; क्रांतिकारी 'जतिंद्रनाथ दास' यांचे स्फूर्तिदायक स्मरण

SCROLL FOR NEXT