football 
क्रीडा

ISL Football League: गोव्याचा ग्लॅन मार्टिन्स प्रथमच राष्ट्रीय संभाव्य संघात

दैनिक गोमंतक

पणजी: इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (ISL Football League) उल्लेखनीय कामगिरी केलेला गोमंतकीय मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स याला प्रथमच भारतीय संभाव्य फुटबॉल संघात स्थान मिळाले आहे. कतारमधील दोहा येथे रवाना झालेल्या 28 सदस्यीय संघात त्याची राष्ट्रीय संघ प्रशिक्षक इगोर स्टिमॅक(Igor Stimac) यांनी निवड केली. वेळसाव येथील 26 वर्षीय ग्लॅनने यंदा आयएसएल स्पर्धेत एटीके मोहन बागानतर्फे पदार्पण केले. कोलकात्यातील संघातर्फे सात सामने खेळल्यानंतर तो एफसी गोवा संघात दाखल झाला. लगेच त्याने प्रशिक्षक हुआन फेरांडो यांचा विश्वास संपादन करत सातत्याच्या जोरावर संघातील जागा पक्की केली. या क्लबतर्फे आठ आयएसएल सामन्यात त्याने एक गोल व एक असिस्ट नोंदविले. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही त्याने एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केले.(Glenn Martins of Goa for the first time in the national potential team)

भारतीय संभाव्य संघात ग्लॅनसह एकूण पाच गोमंतकीय आहेत. यामध्ये एफसी गोवाचा बचावपटू आदिल खान, एफसी गोवाचाच ब्रँडन फर्नांडिस, हैदराबाद एफसीकडून एटीके मोहन बागानशी करारबद्ध झालेला लिस्टन कुलासो, मुंबई सिटी एफसीचा रॉवलिन बोर्जिस या मध्यरक्षकांचा समावेश आहे. याशिवाय एफसी गोवातर्फे खेळणारा गोलरक्षक धीरज सिंग आणि आघाडीपटू ईशान पंडिता यांचीही निवड झाली आहे. भारतीय संघ जूनमध्ये दोहा येथे 2022 विश्वकरंडक आणि 2023 आशिया कप स्पर्धेच्या पात्रता फेरीतील बाकी तीन सामने खेळणार आहे. भारतीय फुटबॉल संघ तीन जून रोजी आशियाई विजेत्या कतारविरुद्ध, सात जूनला बांगलादेशविरुद्ध आणि 15 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. सर्व सामने दोहा येथील जास्सिम बिन हमाद स्टेडियमवर होतील.

कोरोना विषाणू महामारीमुळे भारतात सराव अशक्य असल्याने 28 सदस्यीय चमू दोहा येथे बुधवारी संध्याकाळी रवाना झाला. कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक शिष्टाचाराचे पालन करत संघ कतारला रवा झाला असून सर्व खेळाडूंची मागील 48 तासातील आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे. सर्व खेळाडू 15 मे पासून नवी दिल्लीत हॉटेलमध्ये जैवसुरक्षा वातावरणात होते.

भारताचा 28 सदस्यीय संघ :

गोलरक्षक : गुरप्रीतसिंग संधू, अमरिंदर सिंग, धीरज सिंग,

बचावपटू : प्रीतम कोटल, राहुल भेके, नरेंदर गेहलोत, चिंग्लेन्साना सिंग, संदेश झिंगन, आदिल खान, आकाश मिश्रा, सुभाशिष बोस,

मध्यरक्षक : उदांता सिंग, ब्रँडन फर्नांडिस, लिस्टन कुलासो, रॉवलिन बोर्जिस, ग्लॅन मार्टिन्स, अनिरुद्ध थापा, प्रणॉय हल्दर, सुरेश सिंग, लालेन्गमाविया राल्टे, अब्दुल सहाल, यासीर मोहम्मद, लाल्लियानझुआला छांगटे, बिपिन सिंग, आशिक कुरुनियान,

आघाडीपटू : ईशान पंडिता, सुनील छेत्री, मानवीर सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT