GFA President Kaytan Fernandes Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football News : राज्यातील फुटबॉल मोसम 20 ऑगस्टपासून

धेंपो क्लब-स्पोर्टिंग यांच्यात मदतनिधी सामना, प्रो-लीग स्पर्धा २७ पासून

किशोर पेटकर

Goa Football Association News : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) 2023-24 मधील राज्यस्तरीय फुटबॉल मोसमाला 20 ऑगस्टपासून सुरवात होईल. त्या दिवशी प्रो-लीग स्पर्धेतील गतविजेता धेंपो स्पोर्टस क्लब व गतउपविजेता स्पोर्टिंग क्लब द गोवा यांच्यात मदतनिधी सामना खेळला जाईल.

जीएफएच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेस २७ ऑगस्टपासून सुरवात होईल, अशी माहिती संघटनेच्या सोमवारी झालेल्या कार्यकारिणी बैठकीनंतर अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी दिली.

‘‘२०२३-२४ मोसमाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. २० ऑगस्ट रोजी धेंपो क्लब व स्पोर्टिंग क्लब द गोवा यांच्यात मदतनिधी सामना होईल. २७ ऑगस्टपासून १३ संघांची प्रो-लीग स्पर्धा सुरू होईल. रोमांचक फुटबॉल मोसमाची अपेक्षा आहे,’’ असे कायतान म्हणाले.

प्रो-लीग स्पर्धेत यंदा एकूण चार नवे संघ पदार्पण करत आहेत. प्रथम विभागीय स्पर्धेतून यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी) संघाने पात्रता मिळविली. नंतर साळगावकर एफसीने माघार घेतल्यामुळे प्रथम विभागातील तिसऱ्या क्रमांकावरील कुठ्ठाळी व्हिलेजर्सला जीएफएने संधी दिली. जीनो स्पोर्टस क्लब व पॅक्स ऑफ नागोवा हे प्रो-लीग स्पर्धेतील थेट प्रवेश देण्यात आलेले दोन संघ आहेत.

स्पोर्टिंगचे वाझ नवे स्वीकृत सदस्य

साळगावकर एफसीचे ॲडलियर डिक्रूझ संघटनेबाहेर जात असल्याने जीएफएच्या स्वीकृत सदस्यपदी स्पोर्टिंग क्लब द गोवाचे संचालक डायगो नॅथन वाझ यांची नियुक्ती केल्याची माहिती कायतान यांनी दिली.

‘‘गोमंतकीय फुटबॉलमध्ये ॲडलियर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता, व्यावसायिक लीग क्लबचे प्रतिनिधी या नात्याने जीएफए कार्यकारी समितीत आम्ही तरुण आणि गतिमान डायगो नॅथन यांचे स्वागत करत आहोत. त्यांच्या क्षमतेवर आणि खेळाप्रती वचनबद्धतेवर आमचा पूर्ण विश्वास असून जीएफए त्यांना शुभेच्छा देत आहे,’’ असे कायतान यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT