India vs Pakistan for T20 World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; ICC ने निश्चित केली तारीख

गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात (T20 World Cup) पाकिस्तानचा पराभव करून आयसीसी (ICC) स्पर्धेतील भारताच्या वर्चस्वाला प्रथमच आव्हान देण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दोन कट्टर विरोधक, दोन प्रतिस्पर्धी. जेव्हा हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने असतात, तेव्हा यापेक्षा महत्वाचं काही नसते. रस्त्यावर शांतता पसरते. क्रिकेटचे चाहते टीव्हीच्या स्क्रीनला चिकटून बसतात. स्टेडियममधला गोंगाट खूप मोठ्याने गुंजतो. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात (T20 World Cup) पाकिस्तानचा पराभव करून आयसीसी (ICC) स्पर्धेतील भारताच्या वर्चस्वाला प्रथमच आव्हान देण्यात आले होते. यावेळी भारताच्या बदल केलेल्या तारखेवर आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ज्या दिवशी मैदान-ए-जंग असेल आणि क्रिकेटचा जल्लोष शिगेला असेल तो दिवस क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने निश्चित केला आहे .

ICC ने T20 World Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार असून, त्यात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानही याच 16 संघात असतील. चांगली गोष्ट अशी आहे की या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धेच्या पहिल्या फेरीत खेळण्याची गरज नाही कारण ते आधीच सुपर 12 साठी पात्र ठरले आहेत.

भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबरला आमनेसामने

ICC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान 2022 च्या T20 विश्वचषकातील त्यांच्या मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजेच या स्पर्धेतील दोन्ही संघांपैकी कोणत्याही संघाचा प्रवास निश्चितपणे पराभवाने सुरू होईल. ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या मैदानावर म्हणजेच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटची लढाई पाहायला मिळणार आहे.

T20 विश्वचषकात कोण कोणावर वर्चस्व गाजवत आहे?

T20 विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील ही सातवी लढत असेल. यापूर्वी झालेल्या 6 लढतींमध्ये भारताने 4 सामने जिंकले हेत, तर पाकिस्तानने केवळ एकदाच विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांमध्ये एक सामना टाय झाला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उभय संघांमधील हा पहिला सामना असेल. गेल्या 6 पैकी 5 सामने न्युट्रल व्हेन्युवर झाले आहेत, ज्यात भारताने 3 जिंकले आहेत. म्हणजेच एकूणच भारताचेवर्चस्व कायम आहे. मात्र या वर्चस्वाला पाकिस्तानने गेल्या वेळी विजयाचे बिगुल वाजवून आव्हान दिले आहे. त्यामुळे यावेळी मागील चुकांना बगल देत मैदानात उतरावे लागणार आहे.

सुपर 12 मध्ये एकूण 12 संघ खेळताना दिसणार आहेत. या 12 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 8 संघांची नावे निश्चित झाली आहेत. तर उर्वरित 4 संघ पहिल्या फेरीच्या निकालानंतर शिक्कामोर्तब होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना गट 2 मध्ये स्थान मिळाले आहे. या व्यतिरिक्त या गटात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचे संघ आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT