Mesut Özil Dainik Gomantak
क्रीडा

Mesut Özil Retired: वर्ल्डकप विजेत्या दिग्गजचा फुटबॉलला अलविदा, 'या' कारणांमुळे घेतला निर्णय

जर्मनीचा दिग्गज फुटबॉलर मसुत ओझीलने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Mesut Özil Announces Retirement: फुटबॉल जगतातून मोठी बातमी बुधवारी समोर आली. जर्मनीचा वर्ल्डकप विजेता फुटबॉलपटू मसुत ओझीलने त्याच्या प्रोफेशनल कारकिर्दीला अलविदा केला आहे. तो फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले.

34 वर्षीय ओझील जर्मनीकडून वर्ल्डकप जिंकला असून तो रिअल मद्रिद, अर्सेनलसारख्या क्लबकडूनही खेळला आहे. त्याने जर्मनी संघातून 2018 सालीच निवृत्ती घेतली होती. त्याने जर्मनीकडून वरिष्ठ स्तरावर खेळताना 92 सामन्यांत 23 गोल केले आहेत.

तसेच त्याने विविध क्लबकडून खेळताना 427 सामन्यांमध्ये 73 गोल केले आहेत. एकूणच्या त्याने त्याच्या कारकिर्दीत 645 सामने खेळले असून 114 गोल आणि 222 असिस्ट केले आहेत.

ओझीलने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले की 'मला जवळपास 17 वर्षे प्रोफेशनल फुटबॉल खेळण्याचे भाग्य लाभले. मी मिळालेल्या संधींबद्दल कृतज्ञ आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये काही दुखापतींचा सामना करावा लागला.

त्यामुळे हे स्पष्ट होत गेले की फुटबॉलच्या मोठ्या स्तरावरून पायऊतार होण्याची वेळ आली आहे.'

तसेच त्याने हा अविस्मरणीय क्षणांनी आणि भावनांनी भरलेला प्रवास होता असे म्हणताना त्याच्या सर्व क्लबचेही आभार मानले. त्याने लिहिले की 'मला मी खेळलेल्या सर्व क्लबचे - शाल्के 04, वेर्डर ब्रेमन, रिअर मद्रीद, अर्सेनल एफसी, फेनरबहाचे, बसाकसेहिर आणि मला पाठिंबा दिलेल्या प्रशिक्षकांचे, माझे मित्र बनलेल्या माझ्या संघसहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत.'

'आता मी पुढील आयुष्य माझी पत्नी एमिनी, एडा आणि इला या मुलींबरोबर जगण्यास उत्सुक आहे.'

ओझीलने शाल्के 04 क्लबकडून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तो वेर्डर ब्रेमनकडून खेळला. त्याने या काळात केलेल्या कामगिरीमुळे त्याला 2010 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये जर्मनीकडून खेळण्याची संधी मिळाली.

वर्ल्डकपनंतर त्याने लगेचच रिअल मद्रिदशी करार केला. तो या संघाकडून तीन वर्षे खेळला आणि ला लीगा आणि स्पॅनिश सुपर कप स्पर्धा जिंकल्या. तो रिअल मद्रिदकडून लालीगामध्ये 105 सामने खेळताना 19 गोल केले.

त्यानंतर 2013 साली तो अर्सेनल संघात दाखल झाला. त्याने संघाला एफए कपचे विजेतेपदही जिंरकून देण्यात योगदान दिले. त्याने या संघाकडून प्रीमियर लीगमध्ये 33 गोल आणि 59 असिस्ट केले.

त्याने 2014 साली जर्मनीकडून वर्ल्डकपही जिंकला. ओझीलने 2021 साली फेनरबहाचे क्लबशी करार केला. त्यानंतर वर्षभरातच तो बसाकसेहिर क्लबमध्ये सामील झाला होता. यानंतर आता त्याने प्रोफेशनल कारकिर्दीतूनच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT