Germany Hockey Team | Hockey World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Hockey World Cup 2023: जर्मनी तिसऱ्यांदा जगज्जेता! गतविजेत्या बेल्जियमचा फायनलमध्ये पराभव

जर्मनीने गतविजेत्या बेल्जियमला पराभूत करत हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

Pranali Kodre

Hockey World Cup 2023: भारतात झालेल्या हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या विजेतेपदाची माळ जर्मनीच्या गळ्यात पडली आहे. या स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीने गतविजेत्या बेल्जियमचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

भुवनेश्वरला झालेल्या या सामन्यात जर्मनी सुरुवातीला 0-2 अशी पिछाडीवर होता. मात्र, त्यांनतर त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या हाफमध्ये जर्मनीने दमदार कामगिरी करताना 3-2 अशी आघाडीही मिळवली होती. मात्र अखेरची दोन मिनिटे बाकी असताना बेल्जियमने तिसरा गोल करत बरोबरी साधली.

त्यामुळे या सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटनंतर सडन डेथमध्ये लागला. यात जर्मनीने बाजी मारली. त्यामुळे बेल्जियमचे सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले.

(Germany won third men's Hockey World Cup title after beating defending champions Belgium 5-4 in shootout)म

या सामन्यात सुरुवातीला जर्मनीने चांगला बचाव केला होता. मात्र, पहिल्या क्वार्टरमध्येच 10 व्या मिनिटाला बेल्जियमने गोलचे खाते उघडले. बेल्जियमकडून फ्लोरंट वॅन ऑबेलने पहिला गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटात टँगाय कोसिन्सने दुसरा गोल करत बेल्जियमला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती.

बेल्जियमने ही आघाडी जवळपास दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीसपर्यंत कायम ठेवली होती. मात्र नंतर जर्मनीने आपला खेळ उंचावला. जर्मनीकडून दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस सामन्याच्या 29 व्या मिनिटाला निकलस वेलेनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीला गोलचे खाते उघडून दिले.

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोन्झालो पेइलटने जर्मनीसाठी सामन्याच्या 41 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. त्यामुळे 2-2 अशी सामन्यात बरोबरी झाली. चौथ्या क्वार्टरच्या तिसऱ्याच मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या 48 व्या मिनिटाला मॅट ग्रँबुशने मैदानी गोल करत जर्मनीला आघाडीवर नेले.

जर्मनीने ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र बेल्जियमनेही अखेरपर्यंत झुंज दिली. ज्यामुळे बेल्जियम 3-3 अशी निर्धारित वेळ संपेपर्यंत बरोबरी करू शकले. बेल्जियमकडून तिसरा गोल सामना संपायला केवळ 1 मिनिटे शिल्लक असताना टॉम बूनने केला.

त्यामुळे अखेरीस हा सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला. त्यातही 3-3 अशी बरोबरी झाली. पण त्यानंतर सडन डेथमध्ये जर्मनीने अचूक निशाणा साधताना वर्ल्डकपवरही नाव कोरले.

जर्मनीचे हा तिसरा हॉकी वर्ल्डकप विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2002 आणि 2006 साली हॉकी वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आता 17 वर्षांनी त्यांनी पुन्हा वर्ल्डकप जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT