U-17 WC Dainik Gomantak
क्रीडा

U-17 WC: सलग तिसऱ्या विजयासह जर्मनी अव्वल

नायजेरियाही ‘ब’ गटातून बाद फेरीत

दैनिक गोमन्तक

पणजी: जर्मनीने सलग तिसरा सामना जिंकत ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवून 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सोमवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शेवटच्या साखळी सामन्यात जर्मन संघाने न्यूझीलंडला 3-1 फरकाने पराभूत केले.

(Germany has entered the quarter-finals of the Under-17 Women's World Cup)

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सोमवारी झालेल्या आणखी एका ‘ब’ गट सामन्यात नायजेरियाने विजयाची आवश्यकता असताना चिली संघाला 2-1 फरकाने नमविले. या कामगिरीसह त्यांनीही ‘ब’ गट उपविजेता या नात्याने बाद फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत 21 ऑक्टोबर रोजी जर्मनीसमोर ‘अ’ गट उपविजेत्या, तर नायजेरियासमोर ‘अ’ गट विजेत्या संघाचे आव्हान असेल. दोन्ही सामने नवी मुंबई येथे होतील.

‘ब’ गटात जर्मनीचे सर्वाधिक 9 गुण झाले. नायजेरियाने तीनपैकी दोन सामने जिंकत 6 गुणांची कमाई केली. चिलीचे 3 गुण कायम राहिले, तर न्यूझीलंडला एकही सामना जिंकता आला नाही. या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले.

जर्मनीचा धडाका

फातोर्डा येथील न्यूझीलंडने युरोपीय विजेत्या जर्मनीला पूर्वार्धात 1-1 असे गोलबरोबरीत रोखले होते. मात्र उत्तरार्धात जर्मनीने सहा मिनिटांत दोन गोल नोंदवत ‘ऑल विन’ धडाका राखला. सामन्याची मानकरी ठरलेल्या जर्मनीच्या लॉरीन बेंडर हिने दोन गोल केले. पाचव्या मिनिटास तिने संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर दहाव्या मिनिटास एमिली क्लेग हिच्या गोलमुळे न्यूझीलंडला बरोबरी साधता आली. 54 व्या मिनिटास बेंडर हिने आणखी एक गोल केला. त्यामुळे जर्मनीस आघाडी मिळाली. बेंडरचा हा स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा गोल ठरला. 60 मिनिटास अलारा सेहिटलर हिच्या पेनल्टी गोलमुळे जर्मनीची आघाडी मजबूत झाली.

नायजेरिया चौथ्यांदा बाद फेरीत

महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीत सहाव्यांदा खेळणाऱ्या नायजेरियाने चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली. यापूर्वी 2010, 2012 व 2014 ते या फेरीत खेळले होते. सोमवारी त्यांना, तसेच चिली संघाला विजयाची नितांत गरज होती.

कर्णधार ब्लेसिंग इमॅन्युएल हिने चौथ्या, तर बिसोला मोसाकूने 82 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे आफ्रिकन संघाला स्पर्धेत आगूकेच राखता आली. टॅली रोव्हनर हिने 90+1 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर चिलीची पिछाडी एका गोलने कमी केली, मात्र दुसऱ्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या दक्षिण अमेरिकन संघाला परतीचे तिकीट काढावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT