Viral Video: T20 विश्वचषकापूर्वी बाबर आझम, सुनील गावसकर यांची भेट, बाबरला दिला 'हा' सल्ला

भारत आणि पाकिस्तानमध्ये 23 ऑक्टोबर रोजी पहिला सामना खेळला जाणार आहे.
Babar Azam meets Sunil Gavaskar
Babar Azam meets Sunil GavaskarDainik Goamantak
Published on
Updated on

T20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. पात्रता फेरीतील सामन्यांना सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 23 ऑक्टोबर रोजी पहिला सामना खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दिग्गज माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये क्रिकेटमधील विविध विषयांवर चर्चा झाली. (Babar Azam meets Sunil Gavaskar)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर बाबर आझम आणि सुनील गावस्कर यांच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुनील गावसकर बाबर आझमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. यानंतर या दोघांमध्ये क्रिकेटशी संबंधित काही गोष्टींवर चर्चा होते. यावेळी पाकिस्तानचे काही माजी खेळाडू देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे.

Babar Azam meets Sunil Gavaskar
Kagiso Rabada: गर्लफ्रेंडच्या वडिलांना हिंदीतून Imprece करतोय दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज

सुनील गावसकर यावेळी बाबर आझमला सल्ला देताना दिसत आहेत. "खेळताना मानसिकतेकडे लक्ष द्यायला हवं, शॉटची निवड चांगली असेल तर अडचण येणार नाही. परिस्थितीनुसार शॉट निवडा, कोणतीही अडचण येणार नाही." असा सल्ला सुनील गावसकर यांनी बाबरला दिला. यानंतर सुनील गावसकर यांनी बाबरच्या टोपीवर आपले हस्ताक्षर केले.

Babar Azam meets Sunil Gavaskar
Sourav Ganguly: ''सौरव गांगुलीला ICC निवडणूक लढवण्याची परवानगी द्या'' ममता बॅनर्जींचे मोदींना आवाहन

2022 ची T20 विश्वचषक स्पर्धा अतिशय रंजक होणार असे चित्र आहे. प्रत्येक संघ कसून प्रयत्न करताना दिसत आहे. नामिबिया संघाने पात्रता फेरीच्या सामन्यात आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंका संघाला धूळ चारली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, सोमवारी झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला सहा धावांनी पराभूत केले आहे. दरम्यान, 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com