Gautam Gambhir IPL Offer Dainik Gomantak
क्रीडा

Gautam Gambhir IPL Offer: सीईओ, मेंटॉर अन् पार्टनर... गौतम गंभीर टीम इंडियाचं हेड कोच पद सोडणार? 'या' IPL टीमकडून मोठी ऑफर!

Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या एका मोठ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Sameer Amunekar

Gautam Gambhir Rajasthan Royals offer

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या एका मोठ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) विजेतेपद मिळवून दिल्यानंतर गंभीरने भारतीय संघाची धुरा सांभाळली. मात्र, आता राजस्थान रॉयल्सच्या (RR) नवीन मालकांनी गंभीरला पुन्हा आयपीएलमध्ये आणण्यासाठी एक अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक प्रस्ताव दिल्याचे वृत्त समोर आले आहे. या 'ट्रिपल रोल'च्या ऑफरमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

'दैनिक जागरण'ने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सच्या मालकी हक्कांमध्ये सध्या मोठे बदल होत आहेत. या फ्रँचायझीमधील बहुतांश भागधारक आपले शेअर्स नवीन मालकांना विकण्याच्या तयारीत आहेत. याच नवीन व्यवस्थापनातील एका मालकाने गंभीरला केवळ प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून नव्हे, तर चक्क व्यवसायात भागीदारीचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये गंभीरला संघाचा 'CEO' (मुख्य कार्यकारी अधिकारी), 'मेंटर' (मार्गदर्शक) आणि फ्रँचायझीमध्ये २ ते ३ टक्के हिस्सा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

हा प्रस्ताव कितीही फायदेशीर असला, तरी लोढा समितीच्या शिफारसींनुसार भारतीय क्रिकेटमध्ये 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' हा नियम लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कोणतीही व्यक्ती एकाच वेळी भारतीय राष्ट्रीय संघाचे पद आणि आयपीएल फ्रँचायझीचे पद भूषवू शकत नाही. त्यामुळे जर गंभीरला राजस्थान रॉयल्सची ही 'रॉयल ऑफर' स्वीकारायची असेल, तर त्याला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

गंभीरची सध्याची भूमिका आणि करार

गौतम गंभीरचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतचा (BCCI) करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. सध्या तो भारतीय टी-२० विश्वचषक मोहिमेचे नेतृत्व करत असून टीम इंडियाने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. गंभीरच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या आपल्या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत आहे. मात्र, आयपीएलमधील ही अभूतपूर्व ऑफर भविष्यात कोणती नवी वळणे घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT