Gautam Gambhir  Dainik Gomantak
क्रीडा

T-20 World Cup मध्ये रोहितसोबत ओपनिंग करणार हा खेळाडू, गौतम गंभीरचा मोठा दावा

Gautam Gambhir: टी-20 विश्वचषकात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराट कोहली ऐवजी सलामीसाठी केएल राहुलची निवड केली आहे.

दैनिक गोमन्तक

Gautam Gambhir On Virat Kohli-KL Rahul: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने टी-20 विश्वचषकात विराट कोहली ऐवजी सलामीसाठी केएल राहुलची निवड केली आहे. जो एक कुशल खेळाडू आहे. आशिया कपमध्ये कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सलामीवीर म्हणून त्याने 61 चेंडूत 122 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात राहुलऐवजी त्याने डावाची सलामी करायची की नाही, अशी चर्चा सुरु झाली.

गौतम म्हणाला...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान गंभीर म्हणाला, 'तुम्हाला माहित आहे की, भारतात काय होते. जसे की एखाद्याने चांगले खेळायला सुरुवात केली, उदाहरणार्थ विराट कोहलीने (Virat Kohli) गेल्या सामन्यात शतक झळकावले, तेव्हा राहुल आणि रोहितने बराच काळ काय केले हे आपण सर्व विसरुन जातो. तो पुढे म्हणाला, 'जेव्हा तुम्ही आशिया कपमध्ये कोहलीला सलामी करण्यासाठी पाठवले, तेव्हा कल्पना करा की केएल राहुल (KL Rahul) काय वाटले असेल. पहिल्या सामन्यात त्याने कमी धावा केल्या तर पुढच्या सामन्यात कोहलीने डावाची सुरुवात करायची की नाही, अशी चर्चा सुरु होईल.'

IPL 2022 नंतरच्या दुखापती

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) नंतर, राहुल दुखापतींशी झगडत होता. जेव्हा तो परतला तेव्हा त्याने सात सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावले. आशिया चषक स्पर्धेत त्याने पाच डावात 132 धावा केल्या होत्या. मात्र राहुलच्या नेतृत्वाखालील आयपीएल संघ लखनऊ सुपरजायंट्सशी संबंधित असलेल्या गंभीरने सांगितले की, केएलला मोकळेपणाने खेळण्याची परवानगी दिली पाहिजे. मात्र तुम्हाला या स्थानावर तुमचा अव्वल खेळाडू नको आहे, विशेषत: केएल राहुल जो कदाचित रोहित शर्मा किंवा विराट कोहलीपेक्षा अधिक कुशल असेल."

पंत-कार्तिकला स्थान मिळाले

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या रुपाने दोन यष्टीरक्षक आहेत. अनुभवी सुनील गावसकर यांनी या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. परंतु गंभीर त्यांच्याशी सहमत होताना दिसत नाही. तो म्हणाला, 'तुम्ही असे करु शकत नाही. असे केल्यास तुम्हाला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासेल आणि विश्वचषकात तुम्ही पाच गोलंदाजांसह जाऊ शकत नाही. तुम्हाला बॅकअप आवश्यक आहे. गंभीर पुढे म्हणाला, 'तुम्ही ऋषभ पंतला घेऊन डावाची सुरुवात करु शकता.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT