Gautam Gambhir X/KKRiders
क्रीडा

गंभीरचे KKR मध्ये पुनरागमन! लखनऊची साथ सोडली, आता IPL 2024 मध्ये निभावणार 'ही' जबाबदारी

Gautam Gambhir: गंभीरचे कोलकाता नाईट रायडर्स संघात पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir joins KKR ahead of IPL 2023:

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेची तयारी संघांकडून सुरू झाली असून सपोर्ट स्टाफमध्ये बदल होताना दिसत आहे. आता कोलकाता नाईट रायडर्स संघाकडूनही मोठी घोषणा करण्यात आली आहे. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी घोषित केले आहे की गौतम गंभीर केकेआर संघात पुन्हा सामील होणार आहे.

गंभीर आयपीएलमध्ये आता केकेआरचा मार्गदर्शन (Mentor) म्हणून जबाबदारी सांभाळताना दिसेल. यापूर्वी गंभीर केकेआरकडून खेळाडू म्हणून खेळला आहे. तो 2011 ते 2017 दरम्यान केकेआर संघात होता. त्याने या संघाचे नेतृत्वही केले.

तसेच त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे. त्याचबरोबर 5 वेळा संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरला होता. याशिवाय 2014 साली चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामनाही केकेआरने खेळला.

दरम्यान, गंभीर गेली दोन वर्षे आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाबरोबर मार्गदर्शक म्हणून काम करत होता. पण आता त्याने या संघाची साथ सोडली आहे. आता तो आयपीएल 2024 पासून केकेआर संघाबरोबर दिसेल.

याबद्दल गंभीर म्हणाला, 'मी भावनिक व्यक्ती नाही आणि अनेक गोष्टी मला हलवू शकत नाहीत. पण हे वेगळे आहे. जिथून सुरुवात झाली तिथे परत जाण्यासारखे आहे. मी पुन्हा जांभळ्या आणि सोनेरी जर्सी घालण्यास आतुर आहे. मी फक्त केकेआरमध्ये परत येत नाहीये, तर सिटी ऑफ जॉय (कोलकाता) मध्ये परत येत आहे. मी भूकेला आहे, माझा 23 क्रमांक आहे. अमी केकेआर.'

केकेआरचा सहसंघमालक शाहरुख खान गंभीरबद्दल म्हणाला, 'गौतम नेहमीच या कुटुंबाचा भाग राहिला आहे आणि आमचा कर्णधार मार्गदर्शकाच्या नव्या भूमिकेत पुन्हा घरी येत आहे. आम्ही त्याला खूप मिस केले आणि आता चंदू सर व गौतम केकेआर संघात जादू दाखवताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.'

गंभीर आता केकेआर संघात मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्यासह सपोर्ट्स स्टाफबरोबर काम करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

आयएसआयसोबत बैठक अन् 22 दहशतवाद्यांची यादी! ऑपरेशन सिंदूरनंतर आता नवा खुलासा; POK मधील तळांबाबत जैश कमांडरची जाहीर कबुली

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

SCROLL FOR NEXT