G. R. Kare College of Law win Moot Court Competition Dainik Gomanta
क्रीडा

Moot Court Competition: राष्ट्रीय मुट कोर्ट स्पर्धेत कारे कायदा महाविद्यालयाचा संघ देशात अव्वल

हर्षल देसाईने सर्वोत्कृष्ट पुरुष मूटर पुरस्कार जिंकला

सुशांत कुंकळयेकर

G. R. Kare Law College Win All India National Moot Court Competition: कोरीकोडाय, केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय मूट कोर्ट (प्रतीकात्मक न्यायालय) स्पर्धेत मडगाव येथील गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालयाचा संघ देशात अव्वल ठरला.

हर्षल देसाई, संस्कृती कारे आणि बीएएलएलबी प्रोग्रामच्या अंतिम वर्षात शिकणार दिगज बेणे यांचा समावेश असलेल्या या संघाने अंतीम फेरीत बंगळुरूच्या बीएमएस लॉ कॉलेजच्या संघाला पराभूत केले.

गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालयाच्या विजेत्या संघाने सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कारही पटकावला तर हर्षल देसाईने सर्वोत्कृष्ट पुरुष मूटर पुरस्कार जिंकला.

त्यांना या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील मूट कोर्ट सोसायटीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य गोरोथी सिमोइस, व्यवस्थापन, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संघाचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT