Faf du Plessis ICC
क्रीडा

Faf du Plessis: टी20 वर्ल्डकपसाठी द. आफ्रिका संघात कमबॅकसाठी डू प्लेसिस सज्ज! म्हणाला...

Pranali Kodre

Former South Africa Captain Faf du Plessis hints at return for T20 World Cup 2024:

दक्षिण आफ्रिका संघात गेल्या काही दिवसात अनेक बदल घडलेले दिसत आहेत. त्यातच आता पुढीलवर्षी जूनमध्ये टी20 वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संघांच्या तयारीला सुरुवात झाली असून दक्षिण आफ्रिकेनेही संघबांधणीची तयारी सुरू केली आहे.

याचदरम्यान असे समोर येत आहे की दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस देखील टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन करू शकतो.

फाफ डू प्लेसिस 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी येथे दक्षिण आफ्रिकेकडून अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेकडून कोणताही सामना खेळलेला नाही. त्याने अखेरचा टी20 सामना दक्षिण आफ्रिकेसाठी केपटाऊनला 2020 साली इंग्लंडविरुद्ध खेळला होता.

मात्र, असे असले तरी 39 वर्षीय फाफ विविध फ्रँचायझी क्रिकेट लीगमध्ये शानदार खेळ करताना दिसला आहे. आयपीएल 2023 स्पर्धेतही त्याने 700 हून अधिक धावा फटकावल्या होत्या.

दरम्यान, आता अशीही माहिती मिळाली आहे की दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी त्याच्याशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाबाबत चर्चा केली आहे. डू प्लेसिसने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही.

याबाबत फाफ म्हणाला, 'माझा विश्वास आहे की मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. आम्ही गेल्या दोन वर्षापासून याबद्दल चर्चा करत आहोत. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्डकपसाठी समतोल साधावा लागणार आहे. याबद्दलच आम्ही नवीन प्रशिक्षकांशी चर्चा केली आहे.'

फाफने दक्षिण आफ्रिकेचे 2014 आणि 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये नेतृत्वही केले होते.

दरम्यान वॉल्टर यांनी फाफसाठी दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमनासाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. याशिवाय SA20 ही देशांतर्गत स्पर्धा पुढीलवर्षी होणार आहे, त्या स्पर्धेनंतर टी२० वर्ल्डकपसाठी संघ निश्चित केला जाणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, फाफ डू प्लेसिस असेही म्हटले की 'ज्या खेळावर आपण खूप प्रेम करतो, तो खेळ आणखी खेळण्यासाठी शरीर तयार असेल, यासाठी मी बरीच मेहनत घेत आहे. जेव्हा तुमचे वय वाढते, तेव्हा तुम्ही मेहनत घेणे महत्त्वाचे असते. नाहीतर मग हॅमस्ट्रिंग आणि अन्य अवयव काम करत नाहीत. वेगात धावणे आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्ही स्वत:ला जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्यासाठी तयार ठेवू शकता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT