Harbhajan Singh Dainik Gomantak
क्रीडा

Harbhajan Singh: जगातील अनेक फलंदाजांसाठी 'टर्मिनेटर' राहिलेला 'टर्बनेटर' भज्जी

2001 च्या कसोटी मालिकेत कांगारूं टिम हरभजनसमोर नतमस्तक झाली

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगचा आज वाढदिवस आहे. अनेक वर्षे जगातील अनेक फलंदाजांसाठी 'टर्मिनेटर' राहिलेला 'टर्बनेटर' म्हणून प्रसिद्ध असलेला हरभजन आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 3 जुलै 1980 रोजी पंजाबमधील जालंधर शहरात झाला. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भज्जी हे जगातील सर्व फलंदाजांसाठी भीतीचे दुसरे नाव होते. त्याची खेळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये अतिशय रोमांचक आणि लोकप्रिय होता. (Harbhajan Singh Birthday)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण

हरभजनने 25 - 28 मार्च 1998 रोजी बंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला सामना खेळला. या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या. कांगारू फलंदाज ग्रेग ब्लेवेट हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला बळी ठरला, तर दुसरी विकेट त्याने डॅरेन लेहमनची घेतली. ऑस्ट्रेलियाने हा सामना आठ गडी राखून जिंकला होता.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना हरभजनची भीती

हरभजनने आपल्या 17 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळले आणि या संघासाठी सर्वाधिक विकेट्सही घेतल्या. कांगारूंविरुद्धच्या 18 सामन्यांत त्याने 29.95 च्या सरासरीने 95 बळी घेतले. टर्बानेटरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 417 विकेट्स घेतल्या आणि त्याच्या जवळपास 23 टक्के यश त्यावेळच्या जगातील सर्वोत्तम संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळाले.

2001 च्या कसोटी मालिकेत कांगारूं टिम हरभजनसमोर नतमस्तक झाली

2001 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचा उल्लेख केला तर या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत माजी भारतीय ऑफस्पिनरने एकूण 32 विकेट घेतल्या. मुंबईत झालेल्या पहिल्या कसोटीत त्याला फक्त चार विकेट मिळाल्या आणि भारताचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या दोन सामन्यांमध्ये स्टीव्ह वॉ असो की रिकी पाँटिंग आणि अॅडम गिलख्रिस्ट असो, ऑस्ट्रेलियाचे सगळे फलंदाज भज्जीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये हरभजनने 28 बळी घेत भारताला मालिकेत 2-1 असा संस्मरणीय विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भज्जीच्या कारकिर्दीचा उच्चांक

2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हरभजनच्या कारकिर्दीत शिखर गाठले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात फिरकीच्या जादूगाराने एकूण 13 विकेट घेतल्या. त्याच सामन्यात त्याने कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिकही घेतली. त्याच्या हॅट्ट्रिकमध्ये भज्जीने प्रथम रिकी पाँटिंगला 6 धावांवर बाद केले, दुसरा बळी गिलख्रिस्टला आणि त्याने शेन वॉर्नला सलग तिसऱ्या चेंडूवर पायचीत केले. या सामन्यात फॉलोऑन खेळूनही टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला.

सात वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला

हरभजन सिंगने 12-15 ऑगस्ट 2015 रोजी गाले येथे श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळली. या सामन्यात त्याला एकच यश जेहान मुबारकच्या रूपाने मिळाले. आणि त्यानंतर त्याने भारतीय क्रिकेटला टाटा बाय बाय म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT