Shreyas Iyer
Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

'या' खेळाडूचे हक्क काढून घेत श्रेयस अय्यरला कसोटीत संधी; माजी सलामीवीराची नाराजी

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सुरु झाला आहे. गुरुवारपासून ग्रीन पार्क, कानपूर येथे सुरु झालेल्या या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पदार्पणाची संधी देण्यात आली. कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सामन्यापूर्वी खात्री केली होती की, तो कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयसला चार वेळा प्रतीक्षा केल्यानंतर कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली. राहुल द्रविडने 'इंडिया अ' मध्ये प्रशिक्षक म्हणून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. 22 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामने खेळल्यानंतर अय्यरला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत अय्यरने मधल्या फळीत स्थान मिळवले. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्याला कसोटी कॅपही देण्यात आली.

दरम्यान, अय्यरच्या कामगिरीवर क्रिकेटप्रेमी खूप आनंदित आहेत परंतु भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राचा असा विश्वास व्यक्त केला की, न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत तो त्याच्या जागी दुसरा फलंदाज घेण्यास पात्र होता. सामन्यादरम्यान टिप्पणी करताना आकाशने माजी दिग्गज खेळाडू असणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणला सांगितले की, "हनुमा विहारी या संघात असायला हवा होता, त्याने इतका चांगला खेळ दाखवला आहे. जेव्हा वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती आणि जेव्हा त्याला संघात स्थान मिळाले, तेव्हा सर्व प्रथम या जागेवर हनुमाचा अधिकार होता.''

याआधीही आकाशने ट्विट करुन याबाबत नाराजी व्यक्त केली होती. "अय्यरला या कसोटीत खेळण्याची संधी देण्यात आली होती, परंतु माझा विश्वास आहे की, हनुमा या सामन्यात खेळण्यास पात्र होता. तो प्रथम पात्र ठरला होता. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले नाही. त्याला दक्षिण आफ्रिकेलाही पाठवण्यात आले होते. यावेळी एक दौऱ्यादरम्यान पण टीम इंडियामध्ये (Team India) संघात स्थान मिळणार अशी चिन्हे निर्माण झाले होती मात्र मुख्य संघातून हनुमाचे नाव वगळण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT