ICC T20 Ranking: KL राहुल टीम इंडियाचा नंबर 1 फलंदाज, कोहली टॉप-10 मधून बाहेर

बऱ्याच काळानंतर टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानलाही (Mohammad Rizwan) फायदा झाला आहे.
KL Rahul
KL RahulDainik Gomantak

टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) टी-20 मालिकेतील चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. ICC च्या ताज्या T20 फलंदाजांच्या क्रमवारीत राहुलने एका स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा माजी टी-20 कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच काळानंतर टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानलाही फायदा झाला आहे.

विश्वचषकात अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावल्यानंतर राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही 65 धावा केल्या. अशाप्रकारे राहुलने त्याच्या शेवटच्या 5 डावात 4 अर्धशतके झळकावली. अखेरीस त्याला त्याचा फायदा झाला. ताज्या क्रमवारीत तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

KL Rahul
IND vs NZ: मुंबईच्या तडाखेबंद फलंदाजाची भारतीय कसोटी संघात ऐन्ट्री

त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली अनेक महिन्यांनंतर टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने विश्रांती घेतली, त्यामुळे तो आपल्या क्रमवारीत सुधारणा करु शकला नाही आणि तो 8व्या स्थानावरुन 11व्या स्थानावर घसरला आहे.

दुसरीकडे या फॉरमॅटमध्ये भारताचा नवा कर्णधार बनलेल्या रोहित शर्मालाही उत्कृष्ट फॉर्मचा फायदा झाला असून त्याने दोन स्थानांनी झेप घेत 13व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने विश्वचषकातील शेवटच्या सामन्यांमध्ये तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतकांसह 159 धावा केल्या होत्या.

इतर खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल पुन्हा एकदा पहिल्या दहामध्ये परतला आहे. गुप्टिलने भारताविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली होती. तो आता दहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम तिसऱ्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com