Brett Lee  Dainik Gomantak
क्रीडा

Video: 'आरामसे आरामसे...!', सेल्फीसाठी कारचा पाठलाग करणाऱ्या फॅन्सशी ब्रेट लीचा हिंदीत संवाद

Video Viral: ब्रेट लीने त्याच्या कारचा स्कुटीवरून पाठलाग करणाऱ्या दोन चाहत्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Pranali Kodre

Brett Lee Shares Video of Fans Chasing him: भारतात क्रिकेट सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना भेटण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. केवळ भारतीयच नाही, तर परदेशी खेळाडूंचीही भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता दिसून येते. भारतात लोकप्रिय परदेशी खेळाडूंपैकी ब्रेट ली देखील आहे. नुकताच त्याने भारतीय चाहत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्रेट लीने व्हिडिओ शेअर करताना भारतीय नागरिकांमधील क्रिकेटबद्दलच्या प्रेमाचे कौतुकही केले आहे. दरम्यान, ब्रेट लीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की तो कारमध्ये बसला असून त्याच्या कारचा पाठलाग दोन चाहते स्कुटीवरून करत आहेत. यामध्ये स्कुटी चालवणाऱ्या युवकाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची जर्सी घातलेली आहे.

तसेच तो युवक ब्रेट लीला एक सेल्फी घेण्यासाठी विनंती करत आहे. पण यावेळी ब्रेट ली कारमध्ये होता. त्यामुळे तो त्यांना स्कुटी चालवताना काळजी घेण्यास सांगत होता. यावेळी तो हिंदीत त्यांना 'आरामसे आरामसे' असे म्हणतानाही दिसतो. त्याचबरोबर तो त्यांना हेल्मेट घालण्यासही सांगत आहे.

ब्रेट लीने शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो लाईक्स आल्या असून अनेक युजर्सने त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ब्रेट लीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'भारतात नेहमीच सुंदर सरप्राईज मिळत असतात. त्यांचे प्रेम आवडते.' याबरोबरच त्याने कॅप्शनमध्ये हेल्मेट घालण्याबद्दल सल्लाही दिला आहे.

दरम्यान, ब्रेट ली सध्या आयपीएल 2023 चे समालोचन करण्यासाठी भारतात आहे. तो अनेकदा भारतात येत असतो. त्याने 'अनइंडियन' या ऑस्ट्रेलियन-भारतीय चित्रपटात कामही केले आहे.

ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा ऑस्ट्रेलियाला मोठे विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने 76 कसोटी सामने खेळले असून 310 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 221 वनडे सामन्यांमध्ये 380 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 8 अर्धशतकांसह 2500 हून अधिक धावाही केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT