Kylian Mbappe | Argentina | France| FIFA World Cup 2022 | FIFA 2022  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup: एमबाप्पेने 8 गोलसह जिंकला 'गोल्डन बूट' पुरस्कार; जाणून घ्या आजपर्यंतचे सर्व विजेते

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये गोल्डन बूट जिंकलेले आजपर्यंतचे खेळाडू

Pranali Kodre

Kylian Mbappe: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विजेतेपद अर्जेंटिनाने फ्रान्सवर अंतिम सामन्यात मात करत जिंकले. 120 मिनिटाच्या खेळानंतरही 3-3 ची बरोबरी झाल्याने पेनल्टी शुटआऊटमध्ये या सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 अशा फरकाने विजय मिळवला.

त्यामुळे आता 36 वर्षांचा विश्वविजयाचा दुष्काळ संपवला. अर्जेंटिनाचा हा एकूण तिसरेच विश्वविजेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 साली वर्ल्डकप जिंकला आहे. (FIFA World Cup 2022)

दरम्यान, अर्जेंटिनाने विजय मिळवला असला, तरी गोल्डन बूटवर फ्रान्सच्या कायलिन एमबाप्पेने नाव कोरले. त्याने अंतिम सामन्यात फ्रान्ससाठी हॅट्रिक नोंदवली. त्यामुळे त्याच्या गोलची संख्या ८ वर गेली. त्याने गोल्डन बूटच्या शर्यतीत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले. मेस्सीने ७ गोल नोंदवले.

गोल्डन बूटचे आजपर्यंतचे विजेते -

1930: गिलेर्मो स्टेबिल (8 गोल)

1934: ओल्डरिच नेजेडली (5)

1938: लिओनिदास दा सिल्वा (७)

1950 : ऍडेमिर डी मिनेझिस (9)

1954: सँडर कोसिस (11)

1958: जस्ट फॉन्टेन (13)

1962: फ्लोरिअन अल्बर्ट, गॅरिंचा, व्हॅलेंटीन इव्हानोव्ह, ड्राझन जर्कोविक, लिओनेल सांचेझ आणि वावा (4)

1966: युसेबिओ (9)

1970: गर्ड मुलर (10)

1974: ग्रेगॉर्झ लाटो (7)

1978: मारिओ केम्पेस (6)

1982: पाओलो रॉसी (6)

1986: गॅरी लिनकर (6)

1990: टोटो शिलाची (6)

1994: ओलेग सालेन्को, ह्रिस्टो स्टोइचकोव्ह (6)

1998: डेवॉर सुकर (6)

2002: रोनाल्डो (8)

2006: मिरोस्लाव क्लोज (5)

2010: थॉमस मुलर (5)

2014: जेम्स रॉड्रिग्ज (6)

2018: हॅरी केन (6)

2022: कायलिन एमबाप्पे (8)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT