Carl McHugh Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa Sign Carl McHugh: आयर्लंडचा कार्ल मॅकह्यू एफसी गोवा संघात

2019 पासून आयएसएल स्पर्धा खेळण्याचा अनुभव

किशोर पेटकर

FC Goa Sign Carl McHugh: अगोदर एटीके आणि नंतर एटीके मोहन बागानतर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चार मोसम खेळलेला आयर्लंडचा अनुभवी फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यू एफसी गोवा संघात दाखल झाला आहे. या तीस वर्षीय अष्टपैलू खेळाडूशी दोन वर्षांचा करार करण्यात आला.

मध्यफळीत, तसेच बचावातही खेळू शकणारा कार्ल मॅकह्यू कोलकात्यातील संघातर्फे खेळताना आयएसएल करंडकाचा दोन वेळचा विजेता आहे. तो एफसी गोवा संघातील सहावा आणि अखेरचा परदेशी खेळाडू आहे.

एफसी गोवाने आगामी आयएसएल स्पर्धेसाठी मोरोक्कोचा नोआ सदोई याला संघात कायम राखले असून मॅकह्यू याच्यासह ऑस्ट्रेलियन पावलो रेट्रे, स्पॅनिश कार्लोस मार्टिनेझ, ओडेई ओनोइंडिया व व्हिक्टर रॉड्रिगेझ हे परदेशी खेळाडू आहेत. या मोसमात एफसी गोवाने एकूण १० नवे खेळाडू करारबद्ध केले.

‘‘एफसी गोवाने चांगले खेळाडू करारबद्ध केले आहेत आणि अर्थातच प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण आहे. हल्लीच्या वर्षांत एफसी गोवा संघाविरुद्ध खेळणे मला नेहमीच खडतर वाटले. आता याच संघातर्फे खेळण्याची भावना फार वेगळी आहे,’’ असे कार्ल मॅकह्यू याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

या संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी मॅकह्यू याचे स्वागत केले. ‘‘कार्ल हा विलक्षण गुणवत्तेचा खेळाडू आहे. त्याच्यामुळे संघाला उर्जा लाभेल. शिवाय तो अष्टपैलू असल्याचा फायदा होईल. त्याचा स्पर्धात्मक स्वभाव आणि विजयी मानसिकता एफसी गोवा संघाच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे,’’ असे पुस्कुर म्हणाले.

अष्टपैलू फुटबॉलपटूची कामगिरी

  • आयएसएल स्पर्धेत २०१९ ते २०२३ या कालावधीत कोलकात्यातील एटीके आणि एटीके मोहन बागानचे प्रतिनिधित्व

  • २०१९-२० मध्ये एटीके, तर २०२२-२३ मध्ये एटीके मोहन बागानतर्फे आयएसएल करंडक विजेता

  • आयएसएल स्पर्धेत ६० सामने, ५१३६ मिनिटे, ४ गोल, ३ असिस्ट

  • २०२२-२३ मोसमात आयएसएल स्पर्धेतील २१ सामन्यांत ३ गोल, १ असिस्ट

  • आयर्लंडचे ज्युनियर पातळीवर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व

  • व्यावसायिक क्लब पातळीवर रीडिंग, डनडॉक, ब्रॅडफोर्ड सिटी, प्लायमाऊथ, मदरवेल एफसीतर्फे ३३७ सामने, २० गोल, १२ असिस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT