Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

verna police station Sexual Assault case: वेर्णा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक व सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहआरोपी धर्मेंद्र कुमार प्रसाद (वय ३०) याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
verna police station Sexual Assault case
CourtDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: वेर्णा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक व सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहआरोपी धर्मेंद्र कुमार प्रसाद (वय ३०) याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. पीडितेच्या तक्रारीनुसार, ९ जून २०२४ ते जुलै २०२६ या काळात मुख्य संशयित अर्जुन राम याने आपण अविवाहित असल्याचे भासवून तिच्याशी संबंध ठेवले व नंतर २८ ऑगस्ट २०२४ रोजी बनारस येथे मंदिरात लग्न केले. नंतर तिला मारहाण, शिवीगाळ करून आपल्या मित्रांकडे रवी आणि धर्मेंद्र प्रसाद यांच्याकडे ढकलले व त्यांनी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले.

verna police station Sexual Assault case
Goa Sexual Assault Case: बाबूश मोन्सेरात यांची 9 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; 2016 च्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा

पीडिता गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संशयित धर्मेंद्र हा वेर्णा येथील एका कंपनीत स्टोअर डिपार्टमेंटमध्ये काम करतो, त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला की, मूळ तक्रार फक्त अर्जुन राम विरुद्ध होती. पहिल्या तक्रारीत लैंगिक अत्याचाराचा उल्लेखही नव्हता. सरकारी वकिलाने या जामीन अर्जाला विरोध करताना संशयित परप्रांतीय असल्याने पळून जाण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद केला, तर पीडितेने स्वत न्यायालयात (Court) अर्ज दाखल करून या संशयिताच्या जामीन अर्जाला आपली हरकत नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com