Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

quepem police property dispute attack: आंबावली येथे मालमत्तेच्या वादातून हाणामारीची घटना घडली असून मालमत्ताधारकाच्या वडिलांवर लाकडी दांड्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून केपे पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.
Property Dispute Attack
quepem police property dispute attackDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केपे: आंबावली येथे मालमत्तेच्या वादातून हाणामारीची घटना घडली असून मालमत्ताधारकाच्या वडिलांवर लाकडी दांड्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून केपे पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. ही घटना काल दुपारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या (Property) हक्कासंदर्भातील वादातून काही स्थानिक व्यक्ती संबंधित ठिकाणी जमल्या होत्या. यावेळी चार संशयित आरोपींनी कथितरीत्या लाकडी दांड्यांसह मालमत्तेत प्रवेश करून तक्रारदाराच्या वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मालमत्तेच्या वादातून निर्माण झालेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Property Dispute Attack
Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

या प्रकरणी केपे पोलिस स्थानकात गुन्हा नोंद आहे. केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई यांनी या प्रकरणाची माहिती दिली. तपासादरम्यान अन्य गुन्हे उघडकीस आल्यास संबंधित अतिरिक्त कलमे लागू केली जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com