England Won T-20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

England Won T-20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाची 5 कारणे... वाचा सविस्तर

शाहीन आफ्रिदीची दुखापत इंग्लंडच्या पथ्थ्यावर

गोमन्तक डिजिटल टीम

England Won T-20 World Cup: इंग्लंडने पाकिस्तानला अंतिम सामन्यात नमवून 2022 चा टी-20 वर्ल्डकप उंचावला आहे. या सामन्यात विजयाचे पारडे अनेकदा दोन्ही संघांच्या बाजुने झुकले. तथापि, इंग्लंडच्या विजयात जी पाच कारणे महत्वाची ठरली ती जाणून घेऊया.

इंग्लंडची गोलंदाजी

खरेतर पाकिस्तानची ओपनिंग जोही ही डेंजर समजली जाते. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी या सामन्यात पाकिस्तानवर नियंत्रण मिळवून इंग्लंडच्या फलंदाजांचे काम सोपे करून ठेवले. अवघ्या 137 धावांचे आव्हान हे किरकोळ होते. याचे श्रेय इंग्लंडच्या गोलंदाजांना द्यावे लागेल. विशेषतः सॅम करनने अवघ्या 12 धावांत 3 विकेट घेतल्या तर राशिदने एक ओव्हर मेडन टाकली आणि 2 विकेट घेतल्या. जॉर्डननेही 2 विकेट घेतल्या.

बटलरची कॅप्टनसी

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याची कॅप्टनसी महत्वाची ठरली. एक तर त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. याशिवाय पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने इंग्लंडला चांगली सुरवात करून दिली.

बेन स्टोक्सची फलंदाजी

बेन स्टोक्स हा जगातील एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू मानला जातो. निर्णायक क्षण फटकेबाजी करताना धावगती वाढवून स्टोक्सने ते सिद्ध केले. इंग्लंडचे 4 फलंदाज 84 धावांत बाद झालेले असताना प्रेशर इंग्लंडवर आले होते. पण त्याने आणि मोईन अलीने संयमी फलंदाजी केली. आणि त्यानंतर एका ओव्हरमध्ये षटकार ठोकत तर त्यापुढच्या ओव्हरमध्ये तीन चौकार मारून सर्व प्रेशर पाकिस्तानवर आणले. मोईन अली आऊट झाल्यावरही त्याने संयमी राहात इंग्लंडला विजय मिळवून दिला.

शाहिन आफ्रिदीची दुखापत इंग्लंडच्या पथ्यावर

शाहिन आफ्रिदीला दुखापत झाल्याने त्याला मध्येच मैदान सोडावे लागले. त्याने एक चेंडू टाकला होता. त्याचे उर्वरीत चेंडु इफ्तिकार अहमद याने टाकले. त्याने या ओव्हरमधील 13 धावा इंग्लंडचे मनोबल वाढवणाऱ्या ठरल्या. याच ओव्हरमध्ये बेन स्टोक्सने सिक्सर मारली होती. त्यामुळे पाकिस्तान बॅकफुटवर आला. शिवाय शाहीन आफ्रिदीच्या ओव्हर्स शिल्लक होत्या. आणि हाच या अंतिम सामन्यातील निर्णायक क्षण ठरला. त्यानंतर

पाकिस्तानने संधी गमावली

कमी धावसंख्येनंतरही पाकने इंग्लंडला जखडून ठेवले होते. पण मुळातच त्यांची धावसंख्या कमी होती. 137 ही धावसंख्या टी-20 सामन्यात अॅव्हरेजही समजली जात नाही. त्यामुळे मनोबलाच्या दृष्टीने पाकिस्तानने निम्मा सामना तेव्हाच गमावला होता तर इंग्लंडने हा सामना तिथेच अर्धा जिंकला होता. पाकच्या खेळाडुंनी '1992' ची पुनरावृत्ती करण्यासाठी अगदी रोजेही पाळले होते. पण त्यांनी ही संधी गमावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT