Jasprit Bumrah, Ravindra Jadeja, Karun Nair, Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

Birhday Special: एक-दोन नाही, तर तब्बल 5 भारतीय क्रिकेटर्सचा 6 डिसेंबरला वाढदिवस

Pranali Kodre

भारतीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबर ही तारीख खूपच खास आहे. कारण या दिवशी एक-दोन नाही, तर तब्बल 5 भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस असतो. विशेष म्हणजे या पाचही जणांनी आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. याच 5 क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ.

RP Singh

आरपी सिंग -

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगचा जन्म 6 डिसेंबर 1985 रोजी झाला. त्याने भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे. तो 2007 टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 हून अधिक सामने खेळले असून 120 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

Karun Nair

करुण नायर -

कर्नाटकचा फलंदाज करुण नायरनेही भारतीय संघाचे वनडे आणि कसोटी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने 2016 साली इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत नाबाद 303 धावांची खेळी केली होती.

त्यावेळी तो भारताकडून त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवागनंतरचा दुसराच खेळाडू ठरला होता. त्याने भारताकडून 6 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. त्याचा देखील 6 डिसेंबरला वाढदिवस असतो.

Shreyas Iyer

श्रेयस अय्यर -

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा जन्म 6 डिसेंबर 1994 रोजी झाला असून तो सध्या भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. त्यानेही भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे.

त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तो कसोटी पदार्पणात एक शतक आणि एक अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज देखील आहे.

Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराह -

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील 6 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करतो. बुमराहने त्याच्या पदार्पणाच्या आधीपासूनच त्याने आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यानेही भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व करताना 150 हून अधिक सामने खेळले असून 200 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

Ravindra Jadeja

रविंद्र जडेजा -

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाचाही (Ravindra Jadeja) 6 डिसेंबरला वाढदिवस आहे. 2009 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या जडेजाने भारताकडून 290 हून अधिक सामने खेळले आहेत. तसेच त्याच्या नावावर 5 हजारांपेक्षा अधिक धावा असून 500 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या भारताचा तिन्ही क्रिकेट प्रकारातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT