WPL Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

नीता अंबानी ते मिताली राज, दिग्गजांच्या उपस्थित रंगले पहिले WPL Auction, पाहा क्षणचित्र

सोमवारी वूमन्स प्रीमियर लीगचा (WPL) पहिला लिलाव मुंबईत पार पडला.

Pranali Kodre

WPL Auction 2023: सोमवारी (13 फेब्रुवारी) महिला आयपीएल म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामाचा लिलाव पार पडल. डब्लूपीएलचा हा पहिलाच लिलाव असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले.

या लिलावात डब्ल्यूपीएलमधील मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या पाचही फ्रँचायझी आपापल्या संघाची सर्वोत्तम बांधणी करण्याच्या प्रयत्नात दिसल्या.

Mallika Sagar

डब्ल्यूपीएलचा हा पहिला वहिला लिलाव मुंबईतील जियो वर्ल्ड कॉनवेन्शन सेंटर येथे पार पडला. या लिलावात लिलावकर्ता म्हणून मुंबई स्थित आर्ट कलेक्टर आणि सल्लागार असलेल्या मलिका अडवानी सागर यांनी काम पाहिले. त्यामुळे मलिका सागर बीसीसीआयच्या पहिल्याच महिला लिलावकर्ता देखील ठरल्या.

Roger Binny, Jay Shah and Arun Dhumal

हा लिलाव सुरू होण्यापूर्वी पहिल्या डब्ल्यूपीएलचे आणि या स्पर्धेच्या लोगोचे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि खजिनदार अरुण धुमाळ यांनी उद्घाटन केले. यानंतर लिलावाला सुरुवात झाली.

Mumbai Indians

या लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सच्या टेबलवर संघमालक नीता अंबानी, आकाश अंबानी देखील उपस्थित होते. त्यांनीही लिलावादरम्यान सहभाग नोंदवला.

त्यांच्याबरोबरच मुंबई इंडियन्सच्या महिला संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य असलेली वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी, इंग्लंडची दिग्गज क्रिकेटपटू शारलोट एडवर्ड या देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू माहेला जयवर्धने देखील उपस्थित होता.

Gujarat Giants

याशिवाय अहमदाबादची फ्रँचायझी असलेल्या गुजरात जायंट्सच्या टेबलवर दिग्गज क्रिकेटपटू मिताली राज आणि रेचल हाईन्स उपस्थित होते. त्या बोली लावतानाही दिसल्या. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून क्रिकेट संचालक माईक हेसन देखील दिसले. याशिवाय युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे संघमालकही या लिलावादरम्यान उपस्थित होते.

UP Warriorz

या लिलावात एकूण 87 खेळाडूंवर बोली लागली. या खेळाडूंमध्ये 30 परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. या एकूण 87 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी पाच फ्रँचायझींनी मिळून 59 कोटी 50 लाख रुपये खर्च केले.

Royal Challengers Bangalore

या लिलावादरम्यान सर्वाधिक बोली स्मृती मानधनाला लागली. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तसेच ऍश्ले गार्डनरसाठी गुजरात जायंट्सने आणि नतालिया स्किव्हरसाठी मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 3.20 कोटींची बोली लावली. या तिघी या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या.

Delhi Capitals

डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम यंदा 4 ते 26 मार्चदरम्यान मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

SCROLL FOR NEXT