Yashasvi Jaiswal Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: रोहित-जयस्वालची ऐतिहासिक भागीदारी! नव्वद वर्षांच्या इतिहासात पहिल्यांच झाला 'हा' पराक्रम

WI vs IND, 1st Test: रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात केलेली द्विशतकी भागीदारी ऐतिहासिक ठरली.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st Test, Yashasvi Jaiswal-Rohit Sharma historical Double Hundred Partnership : 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी शतकी खेळी केली. याबरोबरच त्यांची भागीदारीही ऐतिहासिक ठरली.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 65 षटकांच्या आतच 150 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताकडून पहिल्या डावात रोहित आणि जयस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात दिली. या दोघांनी शतके साजरी करण्याबरोबरच द्विशतकी भागीदारी केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली.

त्यामुळे भारताने पहिली विकेट गमावण्यापूर्वीच पहिल्या डावात 79 धावांची आघाडी घेतली होती. त्याचमुळे जयस्वाल आणि रोहितच्या भागीदारीने मोठा इतिहास घडवला आहे. भारताच्या 90 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असे झाले की भारतीय संघाने एकही विकेट न गमावता पहिल्या डावात आघाडी घेतली. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते.

तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वात मोठी भागीदारीही ठरली आहे.

या सामन्यात रोहित बाद झाल्याने सलामीची द्विशतकी भागीदारी तुटली. रोहितला 221 चेंडूत 103 धावांवर एलिक अथानाझने बाद केले. त्यानंतर भारताने शुभमन गिलची विकेटही लगेचच गमावली. त्याला 6 धावांवर जोमेल वॉरिकनने बाद केले.

असे असतानाही जयस्वालने त्याची लय कायम ठेवत फलंदाजी केली. त्याला विराट कोहलीनेही चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ 162 धावांनी आघाडीवर आहे. भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर सलामीवीर यशस्वी जयस्वाल 143 धावांवर आणि विराट कोहली 36 धावांवर नाबाद आहे.

जयस्वालला मोठ्या विक्रमाची संधी

जयस्वल 143 धावांवर नाबाद असल्याने त्याला आता एका मोठ्या विक्रमाची संधी आहे. हा त्याचा पहिलाचा कसोटी सामना आहे. त्यामुळे जर त्याने या सामन्यात द्विशतकाला गवसणी घातली, तर तो असा पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल, जो पदार्पणाच्या कसोटीत द्विशतक करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT