Karachi Stadium Dainik Gomantak
क्रीडा

PSL 2022 सुरु होण्यापूर्वीच कराची स्टेडियमला आग, कॉमेंट्री बॉक्स जळून खाक !

पाकिस्तानमधील (Pakistan) कराची स्टेडियममध्ये 25 जानेवारीला रात्री आग लागली. पाकिस्तान सुपर लीग 2022 च्या सामन्यांनंतर कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये ही आग पहिल्यांदाच लागली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील कराची स्टेडियममध्ये 25 जानेवारीला रात्री आग लागली. पाकिस्तान सुपर लीग 2022 च्या सामन्यांनंतर कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये ही आग पहिल्यांदाच लागली आहे. विजेच्या तारांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मैदानाच्या आत बांधलेला तात्पुरता कॉमेंट्री बॉक्सही जळून खाक झाला. हा कॉमेंट्री बॉक्स पाकिस्तान सुपर लीगसाठी (PSL 2022) तयार करण्यात आला होता. मात्र, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्टेडियमला (Karachi Stadium) लागलेल्या आगीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात धुराचे लोट उठताना दिसत आहेत. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीने म्हटले आहे की, आग वेल्डिंग मशीनमुळे लागली. जरी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. (Fire At Karachi Stadium Before PSL 2022 Starts)

दरम्यान, 27 जानेवारीपासून कराची (Karachi) आणि लाहोरमध्ये (Lahore) सहा संघांची पाकिस्तान (Pakistan) सुपर लीग T20 क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा कराचीत सुरु होणार आहे. पहिला सामना मुलतान सुलतान आणि कराची किंग्ज यांच्यात होणार आहे. या स्पर्धेतील 15 सामने कराचीत खेळवले जाणार आहेत. यानंतर 10 फेब्रुवारीपासून लाहोरमध्ये सामने होणार आहेत. 27 फेब्रुवारीला लाहोरमध्ये प्लेऑफ आणि फायनलही होणार आहे.

बायो बबलमध्ये पाकिस्तान सुपर लीग होतेय

पाकिस्तान सुपर लीगसाठी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोरोना महामारीशी संबंधित सुरक्षा प्रोटोकॉल लागू केले आहेत. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले, "सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा सध्याच्या वातावरणात होत आहेत. कारण आता महामारीबद्दल अधिक माहिती आणि जागरुकता आहे." गेल्या वर्षी मार्चमध्ये सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पीएसएल पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर जूनमध्ये अबुधाबीमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. सातव्या हंगामासाठी, पीसीबीने त्याच कंपनीची सेवा घेतली असून ज्याने गेल्या वर्षी अबुधाबीमध्ये सातव्या हंगामासाठी बायो बबलची व्यवस्था केली होती.

पेशावर संघात कोरोना रुग्ण

नॅशनल स्टेडियमवर कराची किंग्ज आणि मुलतान सुलतान्स यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वीच लीगवर कोरोनाचं सावट आहे. पेशावर झल्मीचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल आणि सपोर्ट स्टाफमधील पाच सदस्यांसह तीन खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत. स्पर्धेच्या तांत्रिक समितीने अकमलच्या जागी इमामुल हकला खेळण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT