भारत-पाकिस्तान (India-Pakistan) किंवा इंग्लंड-ऑस्ट्रेलिया (England-Australia) यांच्यात होऊ शकतो अंतिम सामना शेन वॉर्नची (Shane Warne) भविष्यवाणी Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: अंतिम सामना भारत-पाक किंवा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात होईल

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup) अंतिम सामना भारत-पाकिस्तान (India-Pakistan) किंवा इंग्लंड-ऑस्ट्रेलिया (England-Australia) यांच्यात होऊ शकतो असा अंदाज ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) व्यक्त केला आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला आठ गडी राखून पराभूत केल्यानंतर शेन वॉर्नने हा अंदाज केला आहे. वॉर्न म्हणाला, मला अजूनही विश्वास आहे की, जे संघ प्रत्येक गटात अव्वल राहतील आणि पुढील फेरीत प्रवेश करतील ते असे असतील, सेमीफायनमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत हे संघ प्रवेश करण्याची शक्यात आहे. येथे इंग्लैंड विरुध्द भारत, असा सामना होईल तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरुध्द पाकिस्तान समोरासमोर येऊ शकतात. अंतिम सामना भारत Vs पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया Vs इंग्लंड,” यांच्यात होऊ शकतो. असे वॉर्नने ट्विट केले आहे.

जोस बटलरने 71 धावांची नाबाद खेळी करत इंग्लंडला शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. इंग्लंड आणि पाकिस्तानने विश्वचषकातील आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. भारताने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला असून त्यात त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. आज भारताची लढत न्यूझीलंडविरुद्ध दुबईत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Goa Today's News Live: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा ढासळला !

गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

Pernem Punav Utsav: पेडणेतील प्रसिद्ध 'पुनव' उत्सव उत्साहात साजरा! पावसामुळे हिरमोड; भाविकांच्या संख्येवर परिणाम

SCROLL FOR NEXT