Fans Fight Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचदरम्यान फॅन्समध्ये राडा! मारामारी करतानाचा Video व्हायरल

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यावेळी चाहत्यांमध्ये मारामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Fight Between Cricket Fans: भारतात सर्वाधिक क्रिकेट चाहते पाहायला मिळतात, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अनेकदा हे क्रिकेट चाहते आपल्या संघाला, खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी अनोख्या गोष्टीही करताना दिसतात. अगदी आयपीएल असलं तरी वेगवेगळ्या संघांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडिया वॉरही सुरू होतं. पण यादरम्यानच अरुण जेटली स्टेडियमवरील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहते मारामारी करताना दिसत आहेत.

सध्या आयपीएल 2023 हंगाम सुरु आहे आणि दिल्ली कॅपिटल्सचे अरुण जेटली स्टेडियम हे घरचे मैदानात आहे. याच मैदानात काही चाहते सामना सुरू असताना हाणामारी करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र अद्याप हा व्हिडिओ कोणत्या सामन्याचा आहे आणि सामना पाहाणाऱ्या प्रेक्षकांमध्ये कोणत्या गोष्टीवरून मारामारी झाली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र व्हिडिओत जे दृश्य दिसत आहे, त्याच काही प्रेक्षकांच्या हातात दिल्ली कॅपिटल्सचा झेंडा आहे. यावरून हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सचा सामना सुरू असतानाचा असल्याचे समजते.

दिल्लीची कामगिरी

दरम्यान, दिल्लीच्या आयपीएल 2023 मधील कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी आत्तापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यातील २ सामने जिंकण्यातच त्यांना यश मिळाले आहे. त्यांनी 6 सामने पराभूत झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीने या हंगामात सुरुवातीलाच सलग 5 सामने पराभूत झाले होते. त्यामुळे सध्या दिल्ली गुणतालिकेत 4 गुणांसह सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

शनिवारी दिल्लीने सनरायझर्स विरुद्ध खेळताना सहावा सामना पराभूत झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने दिल्लीसमोर 198 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून फिलिप सॉल्ट (59) आणि मिचेल मार्श (63) यांनी अर्धशतके करताना 112 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी केली होती.

पण त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पुनरागमन केले आणि दिल्लीला 20 षटकात 6 बाद 188 धावांवर रोखले. त्यामुळे दिल्लीला या सामन्यात 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

हैदराबादकडून मयंक मार्कंडेने 4 षटकात 20 धावाच देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, अकिल हुसेन, टी नटराजन आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT