IPL साठी ऐतिहासिक क्षण, 1000 व्या सामन्यात भिडणार मुंबई आणि राजस्थान!

IPL 2023: आयपीएल (Indian Premier League) चा ऐतिहासिक 16 वा सीझन सुरु आहे. ही लीग 2008 मध्ये सुरु झाली होती.
Mumbai Indians VS Rajasthan Royals
Mumbai Indians VS Rajasthan Royals Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: आयपीएल (Indian Premier League) चा ऐतिहासिक 16 वा सीझन सुरु आहे. ही लीग 2008 मध्ये सुरु झाली होती.

आयपीएल 2023 चा 42 वा सामना जो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल, हा या लीगच्या इतिहासातील 1000 वा सामना आहे.

या विशेष सामन्यासाठी विशेष तयारीही सुरु झाली आहे. हा सामना मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्टेडियम वानखेडे येथे होणार आहे. सध्या, राजस्थानचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे.

तर, मुंबईच्या संघाला आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. हा हाय व्होल्टेज सामना रविवार, 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळवला जाईल.

दरम्यान, या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने आठ सामने खेळले असून पाच विजयानंतर संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, सात सामने खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने तीन जिंकले असून चार पराभव पत्करले आहेत. राजस्थानचा संघ सीएसकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून आला होता, तर मुंबईला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जुन्या संघांपैकी एक आहेत. 2008 मध्ये जेव्हा लीग सुरु झाली तेव्हा राजस्थानचा संघ चॅम्पियन बनला होता. तर मुंबई इंडियन्सने 2013, 15, 17, 19 आणि 20 मध्ये आयपीएलचे (IPL) विजेतेपद पटकावले आहे.

Mumbai Indians VS Rajasthan Royals
IPL 2023: सॉल्ट-मार्शची शतकी भागीदारी व्यर्थ! हैदराबादने दिल्लीचा घरच्या मैदानात केला पराभव

हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे?

आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 15 सामने जिंकले असून राजस्थानने 13 वेळा विजय मिळवला आहे.

2008 मध्ये पहिल्यांदा दोन्ही संघांमध्ये लढत झाली होती, ज्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. 2013 पर्यंत दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली होती आणि दोघांनी 6-6 विजय नोंदवले होते.

यानंतर, मुंबईचा जादुई काळ सुरु झाला पण त्यानंतर राजस्थानने पाचवेळच्या चॅम्पियन संघाविरुद्ध 17 पैकी 9 सामने जिंकले. या मोसमातील उभय संघांमधील हा पहिला सामना असेल.

Mumbai Indians VS Rajasthan Royals
IPL 2023: गुजरातने कोलकाताला पराभूत करत गाठला अव्वल क्रमांक! गुरबाजची 81 धावांची खेळी व्यर्थ

कसा होता आयपीएलचा सुवर्ण प्रवास?

ऑक्टोबरमध्ये पहिला विश्वचषक खेळला गेला. आयपीएल सहा महिन्यांनी सुरु झाले. त्या मोसमानंतर ही क्रिकेट लीग जगभर गाजू लागली.

पहिला हंगाम राजस्थान रॉयल्सने जिंकला होता, त्यानंतर डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांनी 15 वर्षांपासून किमान एकदा तरी ट्रॉफी जिंकली.

मुंबई पाच वेळा तर CSK चार वेळा चॅम्पियन ठरले. केकेआरने या लीगची ट्रॉफी दोनदा जिंकली. याशिवाय सनरायझर्स, डेक्कन, राजस्थान आणि गुजरातने प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे.

आता राजस्थानसमोर रोहितच्या मुंबईचे कडवे आव्हान असणार आहे. या दोन संघांमध्ये या लीगचा ऐतिहासिक 1000 वा सामना रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com