Big Fight After FIFA World Cup Final Dainik Gomantak
क्रीडा

Argentina vs Spain: भर मैदानात हायव्होल्टेज ड्रामा! अर्जेंटिना आणि स्पेनच्या खेळाडूंमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; व्हिडिओ तुफान व्हायरल

Big Fight After FIFA World Cup Final: स्पेनने 1-0 अशा फरकाने अर्जेन्टिनाचा पराभव केल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला आणि पाहता पाहता त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले.

Manish Jadhav

Big Fight After FIFA World Cup Final: 'फीफा वर्ल्ड कप 2026' च्या फायनल सामन्यात स्पेनने ऐतिहासिक विजय मिळवत दुसऱ्यांदा जगज्जेतेपदाचा चषक उंचावला. मात्र, या रोमहर्षक विजयाचा आनंद साजरा होत असतानाच मैदानावर एक धक्कादायक आणि गालबोट लावणारी घटना घडली. स्पेनने 1-0 अशा फरकाने अर्जेन्टिनाचा पराभव केल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला आणि पाहता पाहता त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. पराभवाच्या नैराश्यातून अर्जेन्टिनाचा मिडफील्डर लिएंड्रो परेडेस (Leandro Paredes) प्रचंड भडकला आणि त्याने स्पेनच्या खेळाडूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मैदानावर काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सामना संपल्यानंतर स्पेनचे खेळाडू विजयाचा जल्लोष करत असताना, संतप्त परेडेसने स्पेनचा डिफेंडर एरिक गार्सियाला जोरदार धक्का दिला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून गार्सियाचा साथीदार गावी (Gavi) मध्यस्थी करण्यासाठी धावून आला, परंतु परेडेसने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा वाद थांबवण्यासाठी अर्जेन्टिनाचा थियागो अल्माडा पुढे आला आणि त्याने गावीला मागे ढकलले जेणेकरुन तो परेडेसच्या आक्रमक हल्ल्यापासून वाचू शकेल. दोन्ही बाजूंचे खेळाडू आमनेसामने आल्याने मैदानावर मोठा गदारोळ माजला. अखेर अर्जेन्टिनाचे मॅनेजर लिओनेल स्कालोनी (Lionel Scaloni) यांनी तातडीने हस्तक्षेप करत आपल्या खेळाडूंना बाजूला केले आणि ड्रेसिंग रुमकडे नेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. निर्धारित वेळेत एकही गोल न झाल्याने सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. अखेर 106 व्या मिनिटाला स्पेनच्या सब्स्टिट्यूट फेरान टोरेसने निर्णायक गोल करत सामना स्पेनच्या बाजूने झुकवला. या एकाच गोलच्या जोरावर स्पेनने अर्जेन्टिनाची बचाव फळी भेदत 2010 नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. फुटबॉल जगतातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) कारकिर्दीतील हा शेवटचा वर्ल्ड कप सामना होता, परंतु फायनल फेरीतील पराभव आणि सामन्यानंतर झालेल्या या राड्यामुळे मेस्सीसह जगभरातील फुटबॉलप्रेमींची मोठी निराशा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT