Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026: विश्वचषकाचा 'किंग' ब्राझील, सलामीच्या सामन्यात पराभव नाहीच, 88 वर्षांची परंपरा कायम

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या थरारात ग्रुप सी मध्ये ब्राझील आणि मोरोक्को यांच्यात झालेला सामना फुटबॉल चाहत्यांसाठी एका रोमांचक अनुभवासारखा ठरला.

Sameer Amunekar

फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या थरारात ग्रुप सी मध्ये ब्राझील आणि मोरोक्को यांच्यात झालेला सामना फुटबॉल चाहत्यांसाठी एका रोमांचक अनुभवासारखा ठरला. न्यू जर्सीच्या ईस्ट रदरफोर्ड येथील न्यू यॉर्क न्यू जर्सी स्टेडियममध्ये रंगलेली ही लढत १-१ अशा बरोबरीवर संपली. जरी ब्राझीलला विजयाची चव चाखता आली नसली, तरी या बरोबरीसह ब्राझीलने फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासातील आपला ८८ वर्षांपासूनचा एक गौरवशाली विक्रम अबाधित राखला आहे.

नेमारविना ब्राझीलचा संघर्ष

स्टार खेळाडू नेमार दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर असल्याने ब्राझीलच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली होती. याचा फायदा घेत मोरोक्कोने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या २१ व्या मिनिटाला इस्माईल सायबेरीने गोल करून मोरोक्कोला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर सावरून खेळत, ब्राझीलने आपल्या आक्रमणात धार आणली. ३२ व्या मिनिटाला विनसियस ज्युनियरने शानदार गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण दुसऱ्या हाफमध्ये एकाही गोलची नोंद न झाल्याने सामना अनिर्णित राहिला.

८८ वर्षांचा अभेद्य रेकॉर्ड

फिफा वर्ल्ड कपमध्ये सलामीचा सामना न हरण्याचा ब्राझीलचा विक्रम आजही कायम आहे. ब्राझीलला अखेरची हार १९३४ मध्ये स्पेनविरुद्ध स्वीकारावी लागली होती. मात्र, १९३८ पासून २०२६ पर्यंतच्या ८८ वर्षांच्या प्रदीर्घ काळात ब्राझीलने कधीही आपला पहिला सामना गमावलेला नाही.

या कालखंडात ब्राझीलने एकूण २१ सलामीचे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये १७ विजय आणि ४ ड्रॉ मिळवले आहेत. या सामन्यांमध्ये ब्राझीलने तब्बल ४८ गोल केले असून केवळ १८ गोल खाल्ले आहेत.

आता पुढील आव्हानांची तयारी

सामना बरोबरीत सुटल्यामुळे आता दोन्ही संघांसाठी ग्रुप सी मधील पुढील सामने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी ब्राझील आणि मोरोक्को या दोन्ही संघांना आता आपल्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. साखळी फेरीतील या अनपेक्षित ड्रॉमुळे आता ग्रुपमधील चुरस अधिकच वाढली असून, आता सर्व लक्ष आगामी सामन्यांकडे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT