FIFA World Cup 2022  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: सेमीफायनलचे वेळापत्रक निश्चित! कोण कोणाशी करणार दोन हात, घ्या जाणून

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अंतिम 4 संघ निश्चित झाले असून उपांत्य फेरीचे वेळापत्रकही समोर आले आहे.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचा आता अखेरचा आठवडा उरला आहे. या स्पर्धेतील आता अंतिम 4 संघ निश्चित झाले असून अनेक बलाढ्य संघांना बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे.

जगभरातील 32 संघ मुख्य स्पर्धेत खेळले. यातील आता साखळी फेरी, उपउपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करत क्रोएशिया, अर्जेंटिना, मोरोक्को आणि फ्रान्स या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

यातील फ्रान्स आणि क्रोएशिया हे दोन असे संघ आहेत, जे अनुक्रमे गतविजेते आणि गतउपविजेते आहेत. ते फिफा वर्ल्डकप 2018 च्या अंतिम सामन्यात एकमेकांना भिडले होते. आता त्यांना पुन्हा एकदा अंतिम सामन्यात जाण्याची संधी आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत यावर्षीच्या वर्ल्डकपमध्ये अनेक रोमांचक सामने झाले. त्यातही उपांत्यपूर्व फेरीतील जवळपास सर्वच सामन्यांत शेवटपर्यंत रंगत राहिली होती. या फेरीत ब्राझील, पोर्तुगाल यांसारख्या बलाढ्य संघांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे आव्हानही संपुष्टात आले.

उपांत्य फेरीत पोहचलेल्या चारपैकी क्रोएशिया आणि अर्जेंटिना संघांनी तर उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शुटआऊटमध्ये विजय मिळवला. क्रोएशियाने ब्राझीलला आणि अर्जेंटिनाने नेदरलँड्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये मात देत उपांत्य फेरी गाठली. तसेच मोरोक्कोने पोर्तुगालला पराभवाचा धक्का दिला. तर फ्रान्सने इंग्लंडवर मात केली आणि उपांत्य फेरी गाठली.

आता 13 डिसेंबरपासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून) उपांत्य फेरीला सुरुवात होईल. या फेरीचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे.

आता उपांत्य फेरीत विजय मिळवणारे दोन संघ वर्ल्डकप ट्रॉफीसाठी अंतिम सामन्यात भिडतील. अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसैल स्टेडियमवर पार पडेल. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणारे दोन संघ तिसऱ्या क्रमांकासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.

उपांत्य फेरी -

14 डिसेंबर - अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया, (वेळ - मध्यरात्री 12.30 वाजता)

15 डिसेंबर - फ्रान्स विरुद्ध मोरोक्को, (वेळ - मध्यरात्री 12.30 वाजता)

17 डिसेंबर - तिसऱ्या क्रमांकासाठी सामना (वेळ - रात्री 8.30 वाजता)

18 डिसेंबर - अंतिम सामना (वेळ - रात्री 8.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT