Lionel Messi v Luka Modric Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: फायनलच्या तिकीटासाठी अर्जेंटिना - क्रोएशिया आज समोरासमोर

Argentina v Croatia यांच्यातील उपांत्य सामन्यात मेस्सी विरुद्ध मॉर्डिक लढतीकडे सर्वांची नजर असेल.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील उपांत्य फेरीला आता सुरूवात होणार आहे. आज मध्यरात्री 12.30 वाजता अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात लुसैल स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

साखळी फेरीत ग्रुप सी मध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या अर्जेंटिनाने या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 अशा फरकाने पराभूत केले, तर नेदरलँड्सला उपांत्यपूर्व सामन्यात पेनल्टी शुटआऊटमध्ये मात देत उपांत्य फेरी गाठली.

तसेच क्रोएशियाने साखळी फेरीनंतर ग्रुप एफमध्ये दुसरे स्थान मिळवले होते. त्यांनी उपउपांत्यपूर्व सामन्यात जपानविरुद्ध 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये विजय मिळवला. तसेच उपांत्यपूर्व सामन्यांत देखील क्रोएशियाने ब्राझीलविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्येच विजय मिळवला होता.

दरम्यान, गतउपविजेते क्रोएशियाची ताकद त्यांचा बचाव आहे. त्यामुळे ते अर्जेंटिनाचे आक्रमण कसे रोखणार हे पाहाणे औत्सुक्याचे असेल. अर्जेंटिनाकडून लिओनेल मेस्सीची कामगिरी महत्त्वाची ठरेल. दरम्यान, मेस्सीसाठी क्रोएशियाचा संघ एखादा खेळाडू अडकवून ठेवण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी ते मेस्सीविरुद्ध मजबूत बचावावर अवलंबून असतील.

क्रोएशियाकडे मोर्सेलो ब्रोझोविक, मतेओ कोवासिक असे चांगला बचाव करणारे खेळाडू आहेत. तसेच या सामन्यात लुका मॉड्रिक विरुद्ध लिओनेल मेस्सी या दोघांमधील लढत पाहाण्यासारखी असेल. हे दोघेही आपापल्या संघांसाठी सर्वात महत्त्वाचे खेळाडू आहेत.

अर्जेंटिनासाठी एंजल डी मारियाची दुखापत आणि दोन यलो कार्डमुळे गोंझालो मोन्टेल आणि मार्कोस अक्यूनावर आलेली बंदी चिंतेचा विषय आहे. मात्र, त्यांच्याकडे संघात चांगले पर्यायी खेळाडू असल्याने त्यांना सामन्यावर फारसा परिणाम न होण्याची आशा असेल. तसेच क्रोएशियाने सलग दोन सामने बरोबरीनंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये जिंकले असल्याने त्यांची दमछाक अधिक झाली आहे, ही त्यांच्यासाठी चिंतेची गोष्ट असेल.

दरम्यान दोन्ही संघ आत्तापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघांची लय सध्या चांगली आहे. अर्जेंटिनाने गेल्या 41 सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात पराभव स्विकारला होता. तसेच क्रोएशियाने गेल्या 12 सामन्यांत एकदाच पराभव स्विकारला आहे.

आता अर्जेंटिनाचे लक्ष्य सहाव्यांदा फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याचे असेल, तर क्रोएशियाचे दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोचहण्यासाठी प्रयत्नशील असेल. या दोन्ही संघातील जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यात मोरोक्को विरुद्ध फ्रान्स संघात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजयी संघाशी दोन हात करेल. तर पराभूत होणारा संघ तिसऱ्या क्रमांकासाठी सामना खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT