Argentina
Argentina  Dainik Gomantak
क्रीडा

Argentina vs France: मेस्सीची अर्जेंटिना विश्वविजेते! एमबाप्पेची हॅट्रिक ठरली निष्प्रभ

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: रविवारी लुसैल स्टेडियमवर फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सवर पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 च्या गोलफरकाने विजय मिळवला.

यासह अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनंतर विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. तसेच अर्जेंटिनाचा हा एकूण तिसराच विश्वविजय आहे. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 साली वर्ल्डकप जिंकला आहे.

मेस्सीने उघडले खाते

संपूर्ण सामन्यांत अर्जेंटिनाने वर्चस्व राखले होते. त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे 23 व्या मिनिटालाच अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली आणि 26 वा वर्ल्डकप सामना खेळणाऱ्या लिओनल मेस्सीने आपल्या संघाचे गोलचे खाते उघडले.

त्यानंतरही अर्जेंटिनाने आपली लय कायम ठेवली. 36 व्या मिनिटाला मॅक ऍलिस्टरने दिलेल्या असिस्टवर एंजेल डी मारियाने अर्जेंटिनासाठी दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर ही आघाडी अर्जेंटिनाने पहिला हाफ संपेपर्यंत कायम ठेवली होती.

तसेच दुसऱ्या हाफमध्येही अर्जेंटिनाने फ्रान्सला गोलसाठी संघर्ष करायला लावला. मात्र, दुसऱ्या हाफच्या अखेरीस 80 व्या मिनिटाला एमबाप्पेने पेनल्टीवर गोल करत फ्रान्सचे खाते उघडले. त्याच्या पुढच्याच मिनिटाला एमबाप्पेने फ्रान्ससाठी दुसरा गोल केला आणि बरोबरी साधून दिली.

निर्धारित 90 मिनिटाच्या खेळानंतर 8 मिनिटाचा भरपाई वेळ देण्यात आला. या भरपाई वेळेत एमबाप्पेने पुन्हा एकदा गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्जेंटिनाने यावेळी तो गोल होऊ दिला नाही.

त्यानंतर ज्यादाचा वेळेत सामना खेळवण्यात आला. ज्यादावेळेच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाला गोलची संधी मिळाली होती, मात्र फ्रान्सने चांगला बचाव केला. त्यामुळे रोमांच अधिक वाढला. अखेर ज्यादा वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाकडून मेस्सीने गोल करत 3-2 ने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.

पण 118 व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली आणि एमबाप्पेने वैयक्तिक आणि संघासाठी तिसरा गोल केला. नंतर ज्यादावेळ संपेपर्यंत 3-3 अशीच बरोबरी राहिली. त्यामुळे सामना पेनल्टीशुट आऊटमध्ये गेला.

पेनल्टी शुटआऊटचा रोमांच

पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सकडून एमबाप्पेने पहिला गोल केला, त्यानंतर लगेचच मेस्सीनेही अर्जेंटिनासाठी गोल केला. दुसऱ्या संधीमध्ये अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने गोल रोखला. तर अर्जेंटिनाकडून डायबालाने दुसरा गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या संधीमध्येही अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने गोल रोखत अर्जेंटिनाची आघाडी कायम ठेवली. तर अर्जेंटिनाकडून पॅरेडेसने तिसरा गोल करत आघाडी आणखी वाढवली. चौथ्या संधीत फ्रान्सकडून कॉलो मुआनीने गोल केला, त्यामुळे 3-2 अशी अर्जेंटिनाची आघाडी कमी झालेली, मात्र अर्जेंटिनाकडून माँटेलने चौथा गोल करत अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT