Football Dainik Gomantak
क्रीडा

Fatwa Against Football: फुटबॉलप्रेमावर का संतापले मौलवी? 'इस्लामच्या विरोधात...'

Football World Cup 2022 Latest Updates: केरळ, पश्चिम बंगाल, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपची अधिक क्रेझ पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Fatwa Against Football In Kerala: कतारमध्ये सुरु असलेल्या 22 व्या फिफा विश्वचषकाची जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमीही या क्रीडा महाकुंभाचा आनंद घेत आहेत. विशेषत: केरळ, पश्चिम बंगाल, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपची अधिक क्रेझ पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे मात्र, मूलतत्त्ववादी मौलवींना लोकांचे हे फुटबॉलप्रेम आवडत नाही. देशातील सर्वाधिक शिक्षित राज्याचा दर्जा असलेल्या केरळच्या (Kerala) एका प्रभावशाली मुस्लिम संघटनेने या फुटबॉलप्रेमाविरोधात फतवा काढला आहे. खेळाडूंची हिरो म्हणून पूजा करणे इस्लामच्या विरोधात असून अशा वेडेपणाला आळा घालण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

संघटना काँग्रेसच्या मित्रपक्षाशी संबंधित आहे

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, केरळमधील मौलवींची प्रभावशाली संघटना 'समस्थ केरळ जमालयातिल खतीब कमिटी'ने (Samastha Kerala Jamalyathil Khateeb Committee) हा फतवा जारी केला आहे. ही संघटना केरळमधील काँग्रेसचा (Congress) सहकारी पक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) शी संबंधित आहे. अहवालानुसार, शुक्रवारी नमाज पठणानंतर समितीचे सरचिटणीस मौलवी नसर फैजी कुद्दथाई यांनी भाषण केले.

फुटबॉल वेड केरळमध्ये सर्वाधिक

या भाषणात मौलवी फैजी म्हणाले की, ''केरळमध्ये फुटबॉल वेड सर्वाधिक आहे. फुटबॉलपटूंचे मोठमोठे कटआऊट उभारुन राज्यातील तरुण पैशाची उधळपट्टी करण्यात मग्न आहेत. खेळाडूंना हिरो बनवून त्यांची पूजा केली जात आहे. इस्लाममध्ये अशा प्रकारची कृत्ये निषिद्ध आहेत. असे करणे पूर्णपणे इस्लामच्या विरोधात आहे. हा 'वेडेपणा' थांबवण्यासाठी खऱ्या मुस्लिमांनी पुढे यायला हवे. हा पैसा इस्लामच्या प्रचारासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी खर्च केला पाहिजे.''

राज्यात फुटबॉलची प्रचंड क्रेझ

केरळमध्ये मुस्लिमांची मोठी लोकसंख्या आहे. यातील बहुतांश हिंदूंमधून धर्मांतरित झालेले मुस्लिम आहेत. आखाती देशांमध्ये काम केल्यामुळे केरळचे मुस्लिम देशातील इतर मुस्लिमांपेक्षा अधिक समृद्ध आहेत. त्यांच्यामध्ये फुटबॉलची प्रचंड क्रेझ आहे. फुटबॉल विश्वचषकात भारताच्या संघाचा समावेश नाही. त्यामुळे केरळचे मुस्लिम फुटबॉलप्रेमी इतर देशांच्या संघांना त्यांच्या आवडीनुसार पाठिंबा देत आहेत. त्यांच्यामध्ये फुटबॉलची अशी क्रेझ आहे की, अनेकांनी इतर देशांतील फुटबॉलपटूंचे मोठे कट-आउट्स आणि होर्डिंग्ज लावले आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT