FIFA WC Video: चाहत्याने केली हाइटच, दुर्बिणीत घेऊन जात होता दारू

FIFA विश्वचषक 2022 मध्ये अल्कोहोलवर बंदी आहे.
FIFA WC Video
FIFA WC VideoDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA विश्वचषक 2022 कतारमध्ये सुरु आहे. यामध्ये अल्कोहोल हा विषय सतत चर्चेत आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चाहता स्टेडियममध्ये दारू घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोलंड आणि मेक्सिको यांच्यातील सामन्या दरम्यानचा आहे. जो 974 स्टेडियमवर खेळला गेला.

कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्डकपचा (FIFA) शुभारंभ झाला आहे. हा मेगा इव्हेंट सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कतार सरकारने बियरवर बंदी आणली. त्यामुळे फिफा वर्ल्डकप पाहायला कतारमध्ये पोहोचलेल्या जगभरातील लाखो चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. कतारसह सर्व इस्लामिक राष्ट्रांमध्ये दारू पूर्णपणे बंदी आहे.

सोशल मिडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मेक्सिकन चाहता आहे. हा फुटबॉल चाहता स्टेडियममध्ये दारू घेऊन जाण्याचा प्रयत्नात होता. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले.

FIFA WC Video
Netherlands vs Ecuador: नेदरलँड-इक्वाडोर सामना बरोबरीत
  • व्हिडीओमध्ये काय आहे...

व्हिडिओमध्ये एक चाहता आपल्या दुर्बिणीत दारू घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे अस दिसून येत आहे. सुरक्षा रक्षक प्रथम त्या दुर्बिणीतून पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर ते दुर्बिणीच्या लेन्सची कॅप काढून टाकतात. त्यात त्यांना एक लहान कंटेनर दिसतो. त्यानंतर चाहता सुरक्षा रक्षकांना समजवण्याचा प्रयत्न करतो की ते फक्त हँड सॅनिटायझर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

याआधीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. ज्यामध्ये स्टेडियममध्ये बसलेले चाहते बिअरची मागणी करत होते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर दारूसंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com