Australia and New Zealand Women football Teams Dainik Gomantak
क्रीडा

FIFA Women World Cup 2023: गोळीबाराच्या घटनेनंतरही स्पर्धेला दणक्यात सुरुवात! यजमान ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडची विजयी सलामी

FIFA Women World Cup 2023: फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धेला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये गुरुवारी दणक्यात सुरुवात झाली आहे.

Pranali Kodre

FIFA Women World Cup 2023: New Zealand vs Norway and Australia vs Ireland: फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धेला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये 20 जुलै रोजी दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यानंतर पहिल्या दिवशी न्यूझीलंड विरुद्ध नॉर्वे हा सामना ऑकलंडला इडन पार्कला पार पडला, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड हा सामना सिडनीत पार पडला.

पहिल्याच दिवशी यजमानांनी विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने नॉर्वेला 1-0 अशा गोल फरकाने, तसेच ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला 1-0 अशा गोलफरकाने पराभूत केले.

न्यूझीलंडचा विजय

सलामीचा सामना न्यूझीलंड विरुद्ध नॉर्वे यांच्यात झाला. पण याच सामन्याच्या काही तास आधी ऑकलंडमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीसह आणखी दोन नागरिकांचा मृत्यू झाला.

ही घटना नॉर्वे संघ थांबलेल्या हॉटेलच्या काही अंतरावरच घडल्याने अनेकांना धक्का बसला होता. पण त्याचा परिणाम स्पर्धेवर झाला नाही आणि सामना 42 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत वेळेवर सुरू झाला.

दरम्यान पहिल्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये न्यूझीलंड आणि नॉर्वे दोन्ही संघांना गोल करता आला नव्हता. पण दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सामन्याच्या 48 व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून हन्नाह विलकिन्सनने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिला. त्यानंतरही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडने 1-0 असा सहज जिंकला.

ऑस्ट्रेलियाचाही विजय

दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात 75,500 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सिडनीत पार पडला. या सामन्यातही यजमान ऑस्ट्रेलियाला आयर्लंडने तगडी लढत दिली होती. दोन्ही संघांना पहिल्या हाफमध्ये गोल करता आला नव्हता.

पण दुसऱ्या हाफमध्ये सामन्याच्या 52 व्या मिनिटाला स्टेफानी कॅटलीने पेनल्टीवर गोल करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. याच गोलची आघाडी ऑस्ट्रेलियाने शेवटपर्यंत कायम ठेवत विजय संपादन केला. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधीच ऑस्ट्रेलियाची स्ट्रायकर सॅम केरला पोटरीची दुखापत झाली. त्यामुळे तिला पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT