FIFA Women World Cup 2023 सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच फुटबॉल संघ थांबलेल्या हॉटेलजवळ गोळीबार

Shooting incident in Auckland: फिफा महिला वर्ल्डकप सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच संघ थांबलेल्या हॉटेलजवळ ऑकलंडमध्ये गोळीबार झाला. या घटनेच तिघांचा मृत्यू झाला.
Shooting incident in Auckland
Shooting incident in AucklandDainik Gomantak
Published on
Updated on

Shooting incident in Auckland hours before FIFA Women's World Cup 2023 Opening Game : महिला फिफा वर्ल्डकप 2023 स्पर्धा 20 जुलैपासून खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये करण्यात आला असून पहिला सामना न्यूझीलंड आणि नॉर्वे महिला संघांमध्ये ऑकलंडला होणार आहे.

मात्र, सलामीचा सामना होण्याच्या काही तास आधीच एक मोठा गोंधळ झाला. ऑकलंडमध्ये फिफा महिला वर्ल्डकपमध्ये सामील झालेले काही संघ ज्या हॉटेलमध्ये थांबले आहे, तिथे जवळच अचानक गोळीबार सुरू झाला.

या घटनेत दोन नागरिक आणि एका शूटरचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काही पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 जणं जखमी झाले आहेत. ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्याच्या अगदी जवळच गतविजेता अमेरिकेचा महिला फुटबॉल संघ थांबला होता. याबरोबरच फिलिपिन्स आणि नॉर्वे या संघ थांबलेले हॉटेलही जवळच होते. विशेष म्हणजे नॉर्वेला पहिला सामनाही खेळायचा आहे.

Shooting incident in Auckland
Argentina Football: जगज्जेत्या अर्जेंटिनावर होणार FIFA कडून कारवाई, 'या' आरोपांची मिळणार शिक्षा

नियोजित वेळेत सामने

दरम्यान, फिफाने माहिती दिली आहे की या घटनेमुळे जे संघ प्रभावित झाले आहेत, त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. तसेच त्यांना शक्य ती मदत केली जात आहे. तसेच न्यूझीलंड सरकारनेही या घटनेचा परिणाम स्पर्धेवर होणार नसल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नाही, त्यामुळे स्पर्धा निर्धारित नियोजनाप्रमाणेच खेळवली जाणार आहे.

त्याचबरोबर नॉर्वेची कर्णधार मारेन मजेल्ड हिने देखील या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले आहे की त्यांच्या हॉटेलपासून 300-400 मीटर दूर गोळीबार झाला, त्यानंतर काही हेलिकॉप्टर आणि बाकी आपत्कालीन वाहने आल्याने त्याच्या आवाजानेच तिला जाग आली.

त्यानंतर टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर काय झाले आहे, हे समजले. याशिवाय तिने सांगितले की फिफाची हॉटेलच्या आजूबाजूला सुरक्षा प्रणाली चांगली असून त्यांच्या संघाकडेही स्वत:चा सुरक्षा रक्षक आहे. तसेच सध्या सर्व शांत दिसत असून ते नेहमीप्रमाणे सामन्याची तयारी करत आहेत.

Shooting incident in Auckland
FIFA World Cup विजयाचं कौतुक! Messi कडून जगज्जेत्या अर्जेंटिना टीमसाठी सोन्याचे आयफोन गिफ्ट, Photo Viral

तसेच पहिला सामना ऑकलंडमधील इडन पार्कवर होणार आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा वाढवण्यात आले असल्याचे इडन पार्कच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

32 संघात रंगणार थरार

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या 9 व्या फिफा महिला वर्ल्डकपमध्ये 32 संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार असून एकूण 64 सामने खेळवले जाणार आहेत.

अंतिम सामना 20 ऑगस्टला सिडनीमध्ये होणार आहे. तसेच या स्पर्धेतील सामने 9 शहरांतील 10 स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com