FIFA Women World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA Women World Cup 2023 मध्ये दुसऱ्या दिवशी स्वित्झर्लंड, स्पेनचे दणदणीत विजय, तर 'हा' सामना बरोबरीत

महिला फिफा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दुसऱ्या दिवशी तीन सामने पार पडले.

Pranali Kodre

FIFA Women World Cup 2023, Day Two Results: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला फिफा वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी तीन सामने पार पडले असून दोन सामन्यांचे निकाल लागले, तर एक सामना बरोबरीत सुटला.

दुसऱ्या दिवशी नायजेरीया आणि कॅनडा संघात झालेला सामना बरोबरीत सुटला, तर स्वित्झर्लंडने फिलिपाईन्स संघाविरुद्ध 2-0 असा विजय मिळवला. तसेच स्पेनने कोस्टा रिकाला 3-0 अशा गोलफरकाने पराभूत केले.

नायजेरिया विरुद्ध कॅनडा

ऑलिम्पिक चॅम्पियन कॅनडाला नायजेरियाने शेवटपर्यंत चांगली झुंज देताना गोल करण्याची संधी दिली नाही. नायजेरियासाठी गोलकिपर चिमका एनादोझी विजयाची हिरो ठरली. तिने चांगला बचाव करत कॅनडाला गोलपासून रोखले. त्यामुळे हा सामना 0-0 अशा फरकाने बरोबरीत सुटला.

स्वित्झर्लंड विरुद्ध फिलिपाईन्स

दुसऱ्या दिवशीचा दुसरा सामना स्वित्झर्लंड विरुद्ध फिलिपाईन्स संघात झाला. या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी एकमेकांना चांगली लढत दिली होती. पण संपुर्ण सामन्यात चेंडूवर सर्वाधिक ताबा स्वित्झर्लंडचा दिसून आला.

दरम्यान पहिला हाफ गोलशिवायच संपणार असे वाटत असतानाच 45 व्या मिनिटाला रोमाना बचमनने पेनल्टीवर गोल करत स्वित्झर्लंड संघाचे खाते उघडले. तसेच दुसऱ्या हाफमध्ये सामन्याच्या 64 व्या मिनिटाला सेरैना सेवेरिन प्युबेल हिने स्वित्झर्लंडसाठी दुसरा गोल नोंदवत आघाडी वाढवली. ही आघाडी स्वित्झर्लंडने अखेरपर्यंत कायम ठेवत सामना जिंकला.

स्पेन विरुद्ध कोस्टारिका

ग्रुप सीमधील स्पेन आणि कोस्टारिका यांच्यात दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना पार पडला. या सामन्यातील पहिला हाफ चांगलाच नाट्यपूर्ण ठरला. 21 व्या मिनिटाला कोस्टारिकाच्या वेलेरिया डेल कँपोने स्वयंगोल करत स्पेनचे खाते उघडले.

त्यावर स्पेनने पुढच्या 10 मिनिटात दोन गोल करत आघाडी 3-0 अशी केली. यानंतर कोस्टारिकाला पुनरागमन करता आले नाही आणि सामना गमवावा लागला. स्पेनकडून ऐताना बोनमतीने 23 व्या मिनिटाला आणि इस्टर गोन्झालेजने 27 व्या मिनिटाला गोल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT