Luis Rubiales Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup विजयानंतर महिला खेळाडूला किस करणे पडले महागात, स्पॅनिश फुटबॉल अध्यक्षांवर निलंबनाची कारवाई

फिफाने स्पेनच्या फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षांविरुद्ध महिला खेळाडूला किस केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली आहे.

Pranali Kodre

FIFA suspended Spain Football federation chief Luis Rubiales for kissing Jenni Hermoso after Women's World Cup 2023 final :

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये जुलै-ऑगस्टदरम्यान फिफा महिला वर्ल्डकप पार पडला. या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या महिला संघाने इंग्लंड महिला संघाला 1-0 अशा गोल फरकाने पराभूत करत विजेतेपद जिंकले. मात्र या अंतिम सामन्यानंतर एक वेगळाच वाद समोर आला होता.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) शिस्त समितीने स्पेन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांना 3 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. त्यांनी अंतिम सामन्यानंतर स्पेनची खेळाडू जेनी हर्मोसोचे डोके पकडून तिला ओठांवर किस केले होते. हे प्रकरण आता त्यांच्या अंगलट आले आहे.

फिफाने सांगितले आहे की 'फिफा शिस्त समितीचे अध्यक्ष हॉर्जे इवान पलासियो यांनी फिफा शिस्तपाल संहितेतील कलम 51 नुसार लुईस रुबियालेस यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल संबंधित सर्व क्रियांमधून तात्काळ 90 दिवसांसाठी निलंबित केले आहे. 24 ऑगस्ट रोजी रुबियालेस यांच्याविरुद्ध चौकशीला सुरुवात झाली आहे.'

तसेच शिस्तपालन समितीने हार्मासो किंवा तिच्या आसपासच्या लोकांना रुबियालेस आणि स्पेन फुटबॉल संघटनेच्या अधिकाऱ्यांना संपर्क न करण्यास सांगितले आहे.

हार्मोसोने सांगितले आहे की तिच्या मर्जीशिवाय रुबियालेस यांनी किस केले होते. या प्रकरणात रुबियालेस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच त्यांच्याकडून राजीनाम्याचीही मागणी होत होती.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की शुक्रवारी रुबियालेस राजीनामा देणार होते, पण त्यांनी अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला. तसेच अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पेन सरकारने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला असून त्यांनी देशाच्या खेळांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ते जर या प्रकरणात दोषी आढळले, तर मात्र त्यांना पद सोडावे लागणार आहे.

तसेच स्पेन संघातील अनेक खेळाडूंनीही हार्मोसोची साथ दिली आहे. त्यांनी रुबियालेस जोपर्यंत पदावर आहेत, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार!

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

SCROLL FOR NEXT