मैदानात उतरताच अवघ्या 16 वर्षीय खेळाडूने FIFA World Cup मध्ये रचला इतिहास!

Casey Phair: मंगळवारी दक्षिण कोरियाकडून मैदानात उतरलेल्या 16 वर्षीय खेळाडूने महिला आणि पुरुषांच्या फुटबॉल वर्ल्डकप इतिहासात आपले नाव कोरले आहे.
Casey Phair
Casey Phair Dainik Gomantak

Casey Phair is the youngest player to make Football World Cup appearance:

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या फिफा महिला वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू आहे. 20 जुलैपासून 32 संघात सुरु झालेल्या या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू खेळताना दिसत आहेत. पण दक्षिण कोरियाच्या एका खेळाडूने मंगळवारी मैदानात उतरताच इतिहास रचला आहे.

मंगळवारी (25 जुलै) फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दक्षिण कोरियाचा सामना कोलंबिया विरुद्ध झाला. या सामन्यात दक्षिण कोरियाला 2-0 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला. पण या सामन्यात दक्षिण कोरियाकडून कॅसी फेअर खेळताना दिसली.

त्यामुळे ती महिला किंवा पुरुषांच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळणारी सर्वात कमी वयाची फुटबॉलपटू ठरली आहे. तिचे मंगळवारी 16 वर्षे 26 दिवस इतके वय होते. तिच जन्म दक्षिण कोरियात 29 जून 2007 रोजी झाला आहे.

Casey Phair
FIFA Women World Cup 2023 सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच फुटबॉल संघ थांबलेल्या हॉटेलजवळ गोळीबार

कॅसीच्यापूर्वी फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी वयात खेळण्याचा विक्रम दिवंगत इफियानी चिजीनेच्या नावावर होता. ती साल 1999 महिला वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा नायजेरियाकडून खेळली, तेव्हा तिचे वय 16 वर्षे आणि 34 दिवस होते.

कॅसीची आई दक्षिण कोरियाची आहे, तर वडील अमेरिकन आहेत. कॅसी अमेरिकेतच लहानाची मोठी झाली आहे. दरम्यान, कॅसीने सांगितले की 'मैदानात उतरतानी मी खूप नर्व्हस होते. तो भीतीदायक क्षण होता, पण सामना पुढे गेला, तसे मी स्थिरावत गेले.'

दक्षिण कोरियाचे हेड कोच कोलिन बेल म्हणाले, 'तिला खेळण्याची संधी मिळायलाच हवी होती. ती बाकीच्यांप्रमाणे खूप चांगला सराव केला आहे. मला तिला अनुभव देण्यासाठी तिला खेळवायचे होते.'

Casey Phair
FIFA Women World Cup 2023: तिसऱ्या दिवशी रंगला चार सामन्यांचा थरार! या संघांची विजयी सुरुवात

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की कॅसी यावर्षीच्या फिफा महिला वर्ल्डकप स्पर्धेत खेळणारी 16 वर्षांची एकमेव खेळाडू नाही. यावर्षी आणखी दोन खेळाडूही 16 वर्षांच्या आहेत.

इटलीकडून 16 वर्षांची जिउलिया ड्रॅगोनी अर्जेंटिनाविरुद्ध पहिला वर्ल्डकप सामना खेळली, तर शीका स्कॉट कोस्टा रिकाकडून स्पेनवरुद्ध पहिला सामना खेळली. पण ड्रॅगोनी आणि स्कॉट या दोघींचाही जन्म कॅसीच्या आधी 2006 मध्ये झाला आहे.

तसेच या स्पर्धेत आणखी 4 खेळाडू आहेत, ज्या 17 वर्षांच्या आहेत. तसेच 32 संघात 39 किशोरवयीन खेळाडू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com