Hardik Pandya on MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात 15 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने 28 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे.
चेन्नईसाठी मंगळवारी कर्णधार एमएस धोनीने क्षेत्ररक्षणात केलेले बदल, गोलंदाजांचा वापर महत्त्वाचा ठरला. त्याने केलेल्या शानदार नेतृत्वाचे कौतुक गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही सामन्यानंतर केला आहे.
हार्दिक पंड्या सामन्यानंतर म्हणाला, 'हीच एमएस धोनीची सुंदरता आहे. त्याची हुशारी आणि त्याने ज्याप्रकारे गोलंदाजांचा वापर केला, ते पाहून असे वाटत होते की तो 10 धावा वाढवत आहे. आम्ही विकेट्स गमावत गेलो आणि तो गोलंदाजीत योग्य बदल करत गेला. त्याच्यासाठी आनंदी आहे. त्याला पुन्हा रविवारी (28 मे) भेटण्यास आवडेल.'
दरम्यान, गुजरातने हा सामना पराभूत झाला असला, तरी त्यांना अंतिम सामन्यात जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यांना 26 मे रोजी होणारा क्वालिफायर सामना खेळावा लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवला, तरच सलग दुसऱ्यांदा गुजरात अंतिम सामना खेळतील.
याशिवाय पहिल्या क्वालिफायरमधील गुजरातच्या कामगिरीबद्दल हार्दिक म्हणाला, 'मला वाटतं गोलंदाजीत आम्ही चांगले होतो. पण आम्ही काही सोप्या चूका केल्या, त्याच आम्हाला महागात पडल्या. आमच्याकडे जसे गोलंदाज आहे, मला वाटते आम्ही 15 जास्तीच्या धावा दिल्या. आम्ही अनेक गोष्टी योग्य केल्या. आम्ही आमच्या योजनांची अंमलबजावणी करत होतो, पण मध्ये आम्ही धावा दिल्या.'
'पण मला वाटत नाही की जास्त विचार करण्याची गरज आहे. आम्हाला दोन दिवसांनी पुन्हा खेळायचे आहे, अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आम्हाला आणखी एक सामना खेळायचा आहे. या हंगामात आम्ही खरोखरच चांगली कामगिरी केली आहे.'
'आम्हाला दवाची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. आम्ही दोन्ही विभागांमध्ये काही गोष्टी योग्य केल्या नाही. पण आम्ही पुन्हा दोन दिवसांनी होणाऱ्या सामन्यात चांगले खेळू ही अपेक्षा आहे.'
पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच डेव्हॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली.
त्याचबरोबर अखेरीस रविंद्र जडेजानेही 22 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 20 षटकात 157 धावांवर सर्वबाद झाला. गुजरातकडून शुभमन गिलने 42 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त केवळ राशिद खानने 20 धावांचा टप्पा ओलांडला. राशिदने 30 धावांची खेळी केली.
चेन्नईकडून रविंद्र जडेजा, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.